Aryan Shahrukh Khan sakal
मुंबई

शाहरुख-आर्यन भेटी दरम्यान तुरुंगात नेमकं काय घडलं?

तुरुंगातील भावनिक भेटीच्यावेळी शाहरुखने आर्यन खानला विचारलं....

दीनानाथ परब

मुंबई: क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (drug case) तुरुंगात असलेल्या आर्यन खानची (Aryan khan) आज अखेर शाहरुखने आर्थर रोड कारागृहात (Arthur Road jail) जाऊन भेट घेतली. जवळपास तीन आठवड्यानंतर शाहरुखने (Shahrukh khan) मुलाची प्रत्यक्ष भेट घेतली. पिता-पुत्र दोघांसाठी हा अत्यंत भावनिक क्षण होता. दोघे अत्यंत भावूक झाले होते, असे सूत्रांनी सांगितले. आज गुरुवारी प्रत्यक्ष भेट होण्याआधी दोघांची व्हिडीओ कॉलवरुन चर्चा झाली होती.

शाहरुखने आर्यनची भेट घेतली, त्यावेळी दोन जेल गार्ड तिथे उपस्थित होते. कालच आर्यनचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. शाहरुख आर्यनबरोबर इंटरकॉमवरुन बोलला. त्यांच्यामध्ये ग्रिल आणि काचेची भिंत होती. शाहरुखने आर्यनला व्यवस्थित जेवतोस का? असा प्रश्न विचारला. त्यावर आर्यनने तुरुंगातील जेवण आवडत नसल्याचे उत्तर दिले. जेलमधील सूत्रांनी ही माहिती दिली. इंडिया टुडेनं हे वृत्त दिलं आहे.

आर्यनला घरात बनवलेले जेवण देता येऊ शकते का? असा प्रश्न शाहरुखने तुरुंगातील अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी कोर्टाकडून विशेष परवानगी घ्यावी लागेल, असे उत्तर दिले. शाहरुख आणि आर्यनची ही भेट १५ मिनिटांसाठी होती. त्याने मुलाला मानसिक दृष्टया खंबीर बनवण्याचा प्रयत्न केला.

आर्यन खान याला हायकोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही. त्याच्या जामिन अर्जासाठी वकिलांनी हायकोर्टात धाव घेतली. मात्र यावरची सुनावणी २६ ऑक्टोबरला होईल असे न्यायालयाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT