मुंबई

Bus Accident : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरून गावी परतणाऱ्या शिवसैनिकांचा भीषण अपघात, तीन बस अन् ट्रकची टक्कर

शिवसेनेचा दसरा मेळावा झाल्यानंतर आपल्या गावी परतत असणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेनेचा दसरा मेळावा झाल्यानंतर आपल्या गावी परतत असणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात झाला आहे. दसरा मेळाव्यानंतर आपापल्या गावी परतणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांचा मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूर जवळ विचित्र असा भीषण अपघात झाला आहे.

मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीही निर्माण झाली. एक ट्रक आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड - सोयगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते प्रवास करत असलेल्या परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपघात झाला. त्यानंतर मागून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इतर दोन बसेसही एकमेकांवर धडकल्या.

ट्रक आणि एक बस थेट उड्डाणपुलावरील साईड डिव्हायडर तोडून उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोसळल्या तर, इतर दोन बसचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये 6 ते 7 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर काही कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले.

शिंदे गटाच्या मेळाव्याला जाताना गाडीचा अपघात; एकाचा मृत्यू ३ जण जखमी

मेळाव्यासाठी मुंबईला जात असताना शिवसैनिकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. तर ३ जण जखमी झालेत. कवटेमहाकांळ तालूक्यातून जात असताना रत्नागिरी नागपूर महामार्गावरील शिरढोण गावाजवळ हा अपघात झाला. एका ट्रकने पदाधिकाऱ्यांच्या गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. शिंदे गटाच्या युवासेनेचे पदाधिकारी होते अशी माहिती समोर आली आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Clouds Arabian Sea : मॉन्सूनची चाहूल! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर मोठे ढग तयार; मुंबईसह उपनगरांत पावसाला सुरूवात

मंदार चांदवडकर नाही तर तारक मेहतामधील भिडे गुरुजीच्या भूमिकेसाठी 'या' मराठी अभिनेत्याला मिळाली ऑफर !

आनंदवार्ता! वाघ संवर्धनाला नवी चालना; ताडोबातील 'झिनत' ने ओडिशात दिला चार शावकांना जन्म

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावामुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वाढले?

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलात भावात 7% वाढ झाल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू! पाहा तुमच्या जिल्ह्यातील ताजे दर

SCROLL FOR NEXT