मुंबई, ता.19 : फेब्रुवारी महिन्यात औरंगाबादमधून मुंबईच्या प्राणीसंग्रहालयात आलेले शक्ती वाघ आणि करिश्मा वाघिणीची जवळीक वाढली आहे. त्यामुळे भायखळा येथील विरमाता जिजाबाई भोसले उद्यान पाळणा हलण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिन्यात ही वाघाची जोडी भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात आणल्यानंतर काही दिवसात कोविडमुळे प्राणीसंग्रहाल पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. या लॉकडाऊनच्या काळात या जोडीची जवळीक वाढली आहे. गर्भधारणाच्या दृष्टीने वाघीणीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी यांनी सांगितले. ठराविक काळात मादी मवाळ होऊन नराकडे आकर्षित होते. त्या काळात या जोडीला सोबत आणले जाते. असेही सांगण्यात आले. वाघाची मादी तीन चार पिल्लांना जन्म देते. दोन ते अडीज वर्षानंतर वाघ प्रजननासाठी सक्षम होते.
महत्त्वाची बातमी : 22 आणि 23 तारखेला मुंबईत अनेक भागात पाणी येणार नाही; तुमचा परिसर या लिस्टमध्ये आहे का?
प्राणीसंग्रहालयात 14 वर्षानंतर वाघ आला आहे. 2006 मध्ये प्राणीसंग्रहालयातील वाघाचा मृत्यू झाल्यानंतर 2020 च्या फेब्रुवारी महिन्यात ही जोडी औरंगाबाद वरुन आणण्यात आली. यात शक्ती वाघ हा चार वर्षाचा आहे. या वाघाचा जन्म औरंगाबादच्या प्राणीसंग्रहालयात नोव्हेंबर 2016 मध्ये झाला होता. तर, करीश्मा वाघिणीचा जन्म जुलै 2014 मध्ये झाला आहे. या दोघांची वय प्रजननासाठी योग्य आहे. यापुर्वी पेग्निनच्या पिल्ल्याचा जन्म राणीच्या बागेत झाला होता.
वाघानंतर आता लवकरच बिबटेही राणीच्या बागेत दाखल होणार आहेत. त्याचबरोबर अस्वल, तरस असेही प्राणी आणण्यात येणार आहे. त्यांचे पिंजरे बनवण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.
shakti tiger and karishma tigress coming closer to each other for mating
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.