मुंबई

शक्तिमान, सुपरमॅन, अवेन्जर्स त्यांनतर 'हे'च... पोलिसही राहिलेत बघत !

संदीप पंडित

मुंबई - जगभरात कोरोनाचा फैलाव थांबता थांबत नाहीये. अशात प्रत्येक देशात कठोर खबरदारीचे उपाय केले जातायत. काही यामुळे बराच अंशी  कोरोनाच्या संक्रमणावर नियंत्रण देखील मिळतंय. भारतात योग्य वेळी लॉक डाऊन जारी करण्यात आल्याने भारतात कोरोनाचा जगभरच्या तुलनेत हाहाःकार पाहायला मिळाला नाही. मात्र भारताची लोकसंख्या जास्त असल्याने अजूनही भारत कोरोनाच्या विळख्यात आहे. मुंबई, देशाची आर्थिक राजधानी. मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. आता तिसरा लॉक डाऊन सुरु आहे, अशात मुंबई रेड झोनमध्ये आहे त्यामुळे मुंबईत कठोर निर्बंध लागू आहेत. 

कोरोनाचा वाढता  प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने तोंडावर मास्क बंधने कम्पल्सरी केले आहे परंतु यातूनही वेगवेगळ्या युक्त्या करून मास्क वापरणे टाळण्याचे काम अनेक जण करत आहेत. यातच एका नालासोपाऱ्यात एक अवलिया चक्क आपल्या  दाढीचा मास्क तोंडावर बांधून फिरत असल्याचे दिसून आल्याने साऱ्याचे लक्ष वेधले गेले होते.

वसई विरार नालासोपाऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. दररोज इथल्या कोरोना केसेस वाढतायत. अशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तोंडाला मास्क वापराचे  सक्तीचे केले आहे. पण कोणत्या प्रसंगात कोण आपली बुद्धी कशी वापरेल याचा मात्र नेम नसतो. अशाच एका नालासोपाऱ्यातील अवलीयाने चक्क आपली दाढी तोंडावरून डोक्याला बांधून त्याचा मास्क म्हणून वापरत केला आहे.

नालासोपारा पूर्व नागीनदास पाडा परिसरात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हा व्यक्ती फिरताना आढळला. त्याच्या दाडीचा मास्क पाहून पोलीस आणि नागरिकांनाही त्याला बघण्याचा मोह आवरला नाही. त्याची माहिती विचारेपर्यंत पोलिसांना पाहून सदर व्यक्ती तिथून पळून गेली. परंतु काही काळासाठी मात्र या व्यक्तीने कोरोनाची दहशत बाजूला करून नागरिकाचे लक्ष मात्र आपल्याकडे वेधून घेतले होते. त्यामुळे शक्तिमान, सुपरमॅन, अवेन्जर्स आणि त्यांनतर 'हे'च असं म्हंटल तर वावगं ठरू नये...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कर्नाटक-तामिळनाडूमधील कावेरी वादावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

Alien Star Reels Viral: इंस्टावर व्हायरल झालेला ‘एलियन स्टार’ कोण? आधी लोकांनी उडवली थट्टा, आता प्रत्येक व्हिडिओला मिलियन व्ह्यूज

Dangerous River Stunts: पावसाळ्यात अशी चूक करू नका! खवळलेल्या नदीत ३ तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; पोलिसांचा VIDEO VIRAL

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

SCROLL FOR NEXT