मुंबई

सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करणार का?, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

पूजा विचारे

मुंबईः  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर शरद पवार यांनी स्पष्टिकरण दिलं आहे. आशिष शेलारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरु झाली होती. मात्र याचर्चेनंतर शेलार यांनी ते वक्तव्य राजकीय नसून पुस्तकातील संदर्भाशी निगडीत असल्याचं म्हटलं होतं. पण त्यावर आता शरद पवारांनी मोठं विधान केलं आणि ही चर्चा फेटाळून लावली आहे.

सुप्रिया सुळे यांना राज्यातल्या राजकारणात रस नसून त्यांना केंद्रातील राजकारणात रस असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. या वक्तव्यानंतर शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाबाबतची चर्चा फेटाळून लावली. 

काय म्हणाले शरद पवार 

सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणात रस नसून त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रिया सुळे यांना देशपातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. त्यांना देशपातळीवरच काम करण्याची आवड आहे. प्रत्येकाची एक आवड असते. त्यांची आवड देशपातळीवरील कामात असल्याचं पवार म्हणालेत. दैनिक लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी या चर्चेवर भाष्य केलं. 

आशिष शेलार काय म्हणाले होते?

मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्रात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचं प्रकाश शरद पवार यांच्या हस्ते नुकतंच पार पडलं. या प्रकाशन सोहळ्यास आशिष शेलारही उपस्थित होते. यावेळी शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. 

शरद पवार हे मोठ्या मनाचे मोठे नेते आहेत. संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, यासाठी माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं.  मोठ्या पदावर तर बरीच लोकं बसतात, पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्ती या महाराष्ट्रात खूप कमी आहेत, मला कुणाशी तुलना करायची नाही असं शेलार यांनी म्हटलं होतं. असं विधान करुन आशिष शेलारांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चेला पुन्हा तोंड फोडलं होतं. 

sharad pawar clearifies supriya sule is not interested chief minister of maharashtra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT