Sharad-Pawar 
मुंबई

शरद पवार यांना दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर रूग्णालयातून डिस्चार्ज

१२ एप्रिलला ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पित्ताशयावर झाली होती शस्त्रक्रिया

विराज भागवत

१२ एप्रिलला ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पित्ताशयावर झाली होती शस्त्रक्रिया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. १२ एप्रिलला त्यांच्या पित्ताशयावर यशस्वी लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांने कळवले होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आणि गुरूवारी त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

भाजपाच्या नादाला लागू नका, महापौरांचं मुंबईकरांना आवाहन

मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेआधी त्यांना सात दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. रविवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर आज पवार यांना रूग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार हे आज घरी गेल्यानंतर पुढील पाच दिवस त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. २० तारखेनंतर ते आपल्या नियोजित बैठका किंवा कार्यक्रम यांमध्ये ठरल्याप्रमाणे सहभागी होण्याची शक्यता आहे.

घरातच रूग्णावर होऊ शकणार ICU स्तरावरील उपचार

दरम्यान, अनेक वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतर शरद पवार यांच्या पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर सर्वप्रथम एंडोस्कोपी करण्यात आली होती. पण गॉल ब्लॅडरमध्येही खडे असल्याने पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यानुसार शरद पवार यांना रविवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि १२ एप्रिलला दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आज त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनने एवढ्या आनंदाने अबरार अहमदला संघात घेतले; पाकड्यांनी दाखवली लायकी, The Hundred मधून घेऊ शकतो माघार...

Narhari Zirwal : अन्न भेसळीविरोधात झिरवाळ आक्रमक! १९७ नवीन अधिकाऱ्यांची फौज मैदानात, कठोर कायद्याची तयारी

Devendra Fadanvis: 'गॅससाठी रांगा लावू नका', फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Pimpalgaon Ttoll Plaza : टोल की लूट? पूर्वसूचना न देता स्थानिक पास धारकांना बसतोय आर्थिक फटका; आंदोलनाचे संकेत

Latest Marathi News Live Update : आर्मी ऑफिसर बनून डॉक्टरची सायबर फसवणूक

SCROLL FOR NEXT