Sharad Pawar 
मुंबई

आंदोलनावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रवादी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. तसेच चुकीच्या नेतृत्त्वाखाली पाठीशी नाही असेदेखील शरद पवार यांनी म्हटले आहे. नेता चुकीचा असेल तर, त्याचा परिणाम काय होतो, ते आज दिसंल असेदेखील पवार यांनी गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे.(Sharad Pawar First Reaction On ST Worker Protest)

दरम्यान, टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही असेदेखील शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपण आंदोलक कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत. मात्र, चुकीच्या नेतृत्त्वाच्या पाठीशी नाही. नेता चुकीचा असेल तर, त्याचा परिणाम काय होतो, ते आज दिसंल असेदेखील पवार म्हणाले. कुणी चुकीचा रस्ता दाखवत असेल, तर त्या रस्त्याला विरोध करणे ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, एव्हढंच मी सांगतो असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. संकट आलं की आपण सर्व एक आहोत हेच तुम्ही दाखवले, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.

नेता जर शहाणा नसेल तर कार्यकर्त्यांवर कसा दुष्परिणाम होतोय हे आज दिसल्याचे सांगत पवार म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मतभेद असतात, संघर्ष असतात त्यावर टोकाची भूमिका कधीही न घेण्याची परंपरा आहे. मात्र, गेले काही दिवस एसटी कर्मचाऱ्यांना जे काही सांगण्याचा प्रयत्न केला जात होता ते अशोभनीय असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. एसटी कर्मचारी आणि राष्ट्रवादी पक्षाचा गेल्या 50 वर्षांपासून घनिष्ठ संबंध असून, त्यांचे एकही अधिवेशन माझ्याकडून सुटलेले नाहीत. परंतु, या वेळेला कर्मचाऱ्यांना चुकीचा रस्ता दाखवल्याने कारण नसताना एसटी कर्मचारी घरदार सोडून बाहेर राहिल्याचे ते म्हणाले. या संपाचे नेतृत्व ज्यांनी केले ते यासाठी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT