मुंबई

"राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले"; थेट वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात

सुमित बागुल

मुंबई, ता. 7 : "राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले", असे वक्तव्य प्रदेश काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. काँग्रेसच्या नेत्याकडून अशी थेट प्रतिक्रिया आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्व शैलीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत भाष्य केल होते. राहुल गांधी यांच्याकडे सातत्याचा अभाव असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले होते. यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शाब्दीक चकमकीला  सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.

याबाबत बोलताना थोरात म्हणाले की, "राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि त्यांचे नेतृत्व पक्षाने स्विकारले आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस पक्ष संघटीत होत आहे. त्यांनी जिवनात जे दुःख पाहिले, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही सावरत ते नेतृत्व करत आहेत. शरद पवार यांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, परंतू ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असे वाटते".

बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपले मत मांडले. पुढील काळात राहुल गांधीच पक्षाचे समर्थपणे नेतृत्व करणार आहेत असा विश्वासही थोरात यांनी यावेळी व्यक्त केला. राहुल गांधी जे काम करत आहेत त्यांच्याविरोधात भाजपाच्या यंत्रणा कार्यरत असतात, असेही ते म्हणाले.

sharad pawar on rahul gandhi and congress leader balasaheb thorat replies to pawar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT