Sharad pawar vs Ajit pawar Esakal
मुंबई

Sharad pawar Vs Ajit pawar : अजित पवार गटाला शह देण्यासाठी मुंबईत शरद पवार घेणार बैठक!

Sharad pawar Vs Ajit pawar :

सकाळ डिजिटल टीम

Sharad pawar Vs Ajit pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले असताना आता शरद पवार पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महत्वपूर्ण बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये बंडखोरी करणारे नऊ मंत्री वगळता सर्वच आमदारांना उपस्थित राहायला सांगितले आहे.

नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पहायला मिळाले. दोन्हीही गट एकमेकांवर टीका करताना दिसत नसले तरी आपापल्या गटाची ताकद वाढवण्यासाठी दोघेही गट आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. अशातच आज शरद पवार यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

नुकताच शरद पवार यांनी राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे आपला खुलासा सादर केला होता. यानंतर त्यांनी ही बैठक बोलावली आहे. या खुलाश्यामध्ये शरद पवार म्हणाले होते की, मंत्र्यांनी महत्वाकांक्षापोटी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. त्यानंतर आजच लगेच पवारांनी ही बैठक बोलावली आहे.

मात्र दुसरीकडे पवारांच्या बैठकीला जावे की नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार खासदारांना पडला आहे. खास करून अजित पवार समर्थक आमदार-खासदारांना हा प्रश्न पडला आहे. आज अजित पवार यांची कोल्हापूर मध्ये सभा आहे. तर मुंबईमध्ये शरद पवार हे बैठक घेत आहेत. अशावेळी या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात. यावरच कोणाकडे किती ताकद आहे हे समजेल. असे म्हटले जात आहे. असे वृत्त 'साम'ने प्रसारीत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Weekly Horoscope September 2026 : सप्टेंबर १४ ते २० दरम्यान ‘या’ ५ राशींसाठी लॉटरी; नशिबाची जोरदार साथ मिळणार

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT