मुंबई

शरद पवार म्हणालेत मुख्यमंत्रिपदासाठी 'यांच्या' नावावर झाली सहमती

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि महाराष्ट्रातील राजकारणातील अत्यंत महत्त्वाची बैठक मुंबईच्या वरळीतील नेहरू सेंटरच्या चौदाव्या मजल्यावर पार पडली. तब्बल दोन तास ही उच्चस्तरीय बैठक सुरु होती. या बैठकीत मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर कोण बसणार हे नक्की करण्यात आल्याची माहिती समजतेय. दरम्यान, महाविकास आघाडी कडून उद्या पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची सविस्तर माहिती महाराष्ट्राला देण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांना दिली आहे 

शरद पवार यांनी बैठकीतून बाहेर येत अत्यंत महत्त्वाची माहिती माध्यमांन दिली. यामध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमताने संमती झाल्याचं पवारांनी नमूद केलं. त्यामुळे महाविकास आघाडीकडून आता उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिकामोर्तब झाल्याचं बोललं जातंय.   

चर्चा योग्य  आणि सकारात्मक दिशेने सुरु

चर्चा योग्य  आणि सकारात्मक दिशेने सुरु असल्याची माहिती शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना दिली आहे. कोणत्याही मुद्यावर चर्चा अनुत्तरीत राहू नये म्हणून आणखी चर्चा होणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यानंतर माध्यमांना सविस्तर माहिती ही देण्यात येणार आहे.   

या बैठकीत सत्तेतील पदांचे वाटप कशा प्रकारे होणार ? शेतकऱ्यांचे प्रश्न कशा प्रकारे सोडवले जाणार ? याचबरोबर कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.  

महाराष्ट्राच्या सत्तेपासून भाजपला दूर ठेवून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचा निर्णय शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच महाविकासआघाडीने घेतलाय. दरम्यान आता लवकरात लवकर महाविकास आघाडीकडून राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा  केला जाणार आहे. हे सगळं सुरू असतानाच भाजपनं शिवसेनेला पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची ऑफर देल्याची देखील माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेली. मात्र या ऑफरकडे मातोश्रीकडून पाठ फिरवण्यात आलीये. 

महाविकास आघाडीचं सरकार टीकणार नाही

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचं सरकार येणार हे निश्चित झालंय. या महाविकास आघाडीबाबत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी महत्वपूर्ण असं विधान केलंय. महाविकास आघाडीचं सरकार टीकणार नाही असं भाकित नितीन गडकरी यांनी केलंय. या तिन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असल्याचंही गडकरींनी म्हटलंय. एकूणच महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वीच नितीन गडकरींनी महाविकास आघाडीच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलंय..

WebTitle : sharad pawar on who will become CM of maharashtra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात! सेसेक्स 300 अंकांनी खाली; तिमाही निकालांकडे लक्ष्य, कोणते शेअर्स घसरले?

Republic Day 2026: ७७वा की ७८वा? यंदा आपण कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार?

Tiger Viral Video : निसर्गाचा अजब खेळ! वाघाने केली ७ फूट लांब अजगराची शिकार; पर्यटकांच्या अंगावर सरसरून आला काटा

मद्यप्रेमींनो लक्ष द्या! पाच दिवस बंद राहणार दारुची दुकानं, 'या' तारखांचा असेल समावेश

Latest Marathi News Live Update : अमरावती महानगरपालिकेचा नवा फॉर्म्युला अखेर मंजूर

SCROLL FOR NEXT