मुंबई

रेल्वे स्थानकातच तिने दिला बाळाला जन्म 

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कल्याण रेल्वेस्थानकावरच एका महिलेने बाळाला जन्म दिला असून यावेळी रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी तिला सहकार्य केले. विशेष म्हणजे स्थानकावर करण्यात आलेल्या या प्रसुतीनंतर देखील महिला व मुल दोघेही सुखरूप आहेत.

गुरुवारी (ता. 30) सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास शाजिद कमरुद्दीन मुख्तार शेख ( 28 ) ही महिला पुणे ते डोंबिवली असा प्रवास करीत होती. दरम्यान, तिला प्रसूतीकळा आल्याने ती अत्यवस्थ अवस्थेत असल्याचे एमएसएफ कर्मचाऱ्याना आढळले. त्यांनी ताबडतोब रेल्वे सुरक्षा बल; कल्याण यांना कळविले.

रेल्वे सुरक्षा बल पोलिस यांनी एलएसआय के. साहू व महिला एमएसफ कर्मचारी छाया नाईक ताबडतोब आवश्‍यक प्राथमिक उपचार करण्याकरिता घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी प्रवासी महिलेची सुखरूप प्रसूती केली. शाजिद या महिलेने एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर महिलेला व बाळाला रुक्‍मिणीबाई
रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल केले.  

web title : She gave birth at the train station


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT