मुंबई

शाळेत पन्नास टक्के उपस्थिती बंधनकारक, शासन निर्णय मागे घेण्याची शिक्षक भारतीची मागणी

तेजस वाघमारे

मुंबई, ता. 29 : राज्यातील शाळांमध्ये 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत मार्गदर्शक सुचना देणारा निर्णय संदिग्ध आणि अनाकलनीय आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत विद्यार्थ्यांसाठी आणि नियमित वर्ग घेण्यासाठी बंद राहतील अशा सूचना शासन निर्णयात दिलेल्या असून 1 नोव्हेंबर पासून शाळा उघडणार का असा प्रश्न राज्यातील शैक्षणिक संस्था व मुख्याध्यापकांना पडला आहे.

व्हॅक्सीन आल्याशिवाय शाळा, महाविद्यालय उघडू नये अशी मागणी पालकांकडून होत असतांना 50 टक्के शिक्षक, शिक्षकेतरांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करणारा शासन निर्णय तातडीने मागे घ्या अशी मागणी आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीने केली आहे.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये शिक्षक शिक्षकेतरांना प्रवेश देण्यापूर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करणे, हँडवॉश, सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, सहा फुट अंतर ठेवणे, 3 ते 4 तासानंतर सॅनिटायझेशन करणे, शाळेत प्रवेश करतांना थरमल स्कॅनरने तापमान तपासणे, अध्यापन साहित्य, संगणक, लॅपटॉप, प्रिंटर या उपकरणांचे 70 टक्के अल्कोहल वाईपने निर्जंतुकीकरण इत्यादी बाबींचा समावेश केला आहे.

या संपूर्ण  व्यवस्थेसाठी शैक्षणिक संस्थाना किमान 25 हजार ते 1 लाखापर्यंत खर्च येणार आहे. त्याची कोणतीही आर्थिक मदत सरकारने जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना व्हॅक्सीन दिल्याशिवाय  शाळेत बोलावू नये. अशी मागणी शिक्षक भारतीचे कार्यवाह सुभाष मोरे यांनी केली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

shikshak bharati opposes cabinet decision of compulsory attendance of 50 percent teachers in school

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Nadar: नादर कुटुंबाचे दररोज ७.१ कोटी रुपयांचे दान, दानशूरतेमध्ये सलग पाचव्या वर्षी अव्वल

IND vs NZ, Test: रिषभ पंतचा षटकार ठोकत शतकाचा चौकार! रोहित-गेलला टाकलं मागे अन् आता सचिन तेंडुलकरचा विक्रम धोक्यात

Hormuz Strait Swim : समुद्रात उतरला अन् काही मिनिटांतच स्फोट! होर्मुझमध्ये पोहताना जलतरणपटूने काय पाहिलं? धक्कादायक अनुभव

Marathi News Live Updates : श्रीवर्धन मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला - खासदार सुनिल तटकरे

Crime News: केक पडल्याच्या वादातून मध्यरात्री घरावर हल्ला; तरुणावर कोयत्याने वार, आजोबांचा हात मोडला, आजी-आजोबांसह नातवाला बेदम मारहाण.

SCROLL FOR NEXT