Ravindra Waikar 
मुंबई

Ravindra Waikar: 'शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांचा विजय मॅनेज'; पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

Ravindra Waikar win was Managed: केवळ ४८ मतांनी विजय झाला होता. याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांचा विजय झाला आहे. त्यांचा केवळ ४८ मतांनी विजय झाला होता. याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे. रवींद्र वायकर यांनी विजय मॅनेज केला असं म्हणत दोन अपक्ष उमेदवारांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदू समाज पक्षाचे भरत शाह आणि जनआधार पार्टीचे सुरिंदर अरोरा मोहन यांनी वनराई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यावर अद्याप काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांनी निवडणूक आयोगामध्ये वायकर यांच्या विजयाला आव्हान देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे याप्रकरणात पुढे काही होतं का? हे पाहावं लागणार आहे.

रवींद्र वायकर यांचा विजय मॅनेज असल्याचं तक्रारीमध्ये म्हणण्यात आलं आहे. वनराई पोलिसांकडून याबाबत अद्याप काही कारवाई करण्यात आलेली नाही. तक्रारीमध्ये असं म्हणण्यात आलंय की, 'मतमोजणीवेळी वायकर यांचे कुटुंबीय मतदान केंद्रात उपस्थित होते. काही काळ मतमोजणी थांबली होती. मतमोजणी डिस्प्ले होणं बंद झालं होतं. मोबाईल फोनला बंदी असताना मतदान केंद्रामध्ये वायकर कुटुंबियांकडून तो वापरण्यात आला.'

दरम्यान, वायव्य मुंबई मतदारसंघामध्ये मुख्य लढत ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यामध्ये झाली. त्यांच्यातील ही लढत अत्यंत चुरशीची होती असंच म्हणावं लागेल कारण वायकर यांचा विजय अवघ्या ४८ मतांनी झाला आहे. सुरुवातीला अमोल कीर्तिकर यांचा २ हजार मतांनी विजय झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. पण, त्यानंतर वायकर यांनी फेरमोजणीची मागणी केली. त्यात वायकर यांचा ४८ मतांनी विजय झाला.

अमोल कीर्तिकर यांनी वायकर यांच्या विजयाला निवडणूक आयोगात आव्हान देण्याचे ठरवले आहे. त्यातच आता दोन अपक्ष उमेदवारांनी वायकर यांच्या विजयाबाबत शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

Deepti Sharma: गेल्या वर्षी वर्ल्ड कप जिंकवला, अन् आता पाकिस्तानलाही नडली! भारताच्या 'या' लेकीने ऐतिहासिक विजयानंतर नेमकं काय म्हटलं?

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरला येणार!, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंदाच्या पाहणीसाठी दाखल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला धक्का? महावितरणकडून स्मार्ट मीटरसाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, वाद पेटला

Whatsapp मध्ये मोठं अपडेट! आता विना मोबाईल करता येणार व्हिडिओ अन् ग्रुप वॉइस कॉल; पण कसं? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT