ulhasnagar  sakal
मुंबई

Ulhasnagar News : उल्हासनगरात टेंडर वॉरच्या घोटाळ्या वरून शिवसेना-भाजपात भडका ; महायुतीत वादाची ठिणगी

गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या माजी महापौर लिलाबाई आशान यांचे चिरंजीव अरुण आशान यांच्या पुढाकाराने झा.पी कंपनीला उल्हासनगर महापालिकेतील कोट्यवधीचे कंत्राट मिळत आहेत.यात घोटाळे झाले असून त्यात प्रशासनही सहभागी आहे

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर: गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या माजी महापौर लिलाबाई आशान यांचे चिरंजीव अरुण आशान यांच्या पुढाकाराने झा.पी कंपनीला उल्हासनगर महापालिकेतील कोट्यवधीचे कंत्राट मिळत आहेत.यात घोटाळे झाले असून त्यात प्रशासनही सहभागी आहे.असा आरोप भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.या कंपनीला ब्लॅक लिस्टेड करून 15 दिवसात गुन्हा करण्यात आला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देखील रामचंदानी यांनी दिला आहे.

यावेळी आमदार कुमार आयलानी,माजी महापौर मीना आयलानी,कोषाध्यक्ष प्रकाश माखीजा,माजी स्थायी समिती सभापती राजेश वधारीया,माजी नगरसेवक डॉ.प्रकाश नाथानी,शेरी लुंड,किशोर वनवारी,पदाधिकारी अमर लुंड,लता पगारे आदी उपस्थित होते. तर दुसरीकडे अरुण आशान यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले करताना रामचंदानी यांनी केलेले आरोप म्हणजे बिनबुडाचे आणि "चोराच्या उलट्या बोंबा"असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगून पलटवार केला आहे.

रामचंदानी यांचा मुलगा देखील कंत्राटदार असून त्याच्यासाठी ते अधिकाऱ्यांवर डबाव टाकत असल्याचा आरोप करून आयुक्तांनी त्यांची कंपनी ब्लॅक लिस्टेड केल्याचे पत्र आशान यांनी पत्रकारांसमोर सादर केले आहे.झा.पी कंपनीचे सर्वेसर्वा प्रेम झा यांनी सुध्दा प्रदीप रामचंदानी हे स्वतः माझ्या व्यवसायात 20 टक्के पार्टनर आहेत.मात्र आमचा वाद हा एका टेंडर प्रक्रियेवरून असल्याचा गौप्यस्फोट केला असून रामचंदानी यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे.यावर प्रेम झा यांनी मी त्यांचा पार्टनर असल्याचा पुरावा सादर करण्याचे आव्हान रामचंदानी यांनी झा यांना दिले आहे.

विशेष म्हणजे प्रदीप रामचंदानी हे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत.शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या खास मर्जीतले समजले जातात.रामचंदानी आणि आशान हे महायुतीतील स्थानिक मुख्य पदाधिकारी असतानाही त्यांच्यात टेंडर वॉर घोटाळ्याचा भडका उडाल्याने शहरातील राजकारण तापले आहे.त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.वरिष्ठ नेते यावर कोणता निर्णय घेतात याकडे विविध पक्षातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला मारहाण; मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिकांवर गुन्हा

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

SCROLL FOR NEXT