shivsena sakal
मुंबई

Mumbai : डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा सूर;बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष

निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर होताच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला पहायला मिळाला.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह देण्यात आले. निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर होताच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला पहायला मिळाला.

डोंबिवलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेमध्ये देखील शिवसेनाचा सूर निनादल्याचे पहायला मिळाले. डोंबिवलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेसमोर रात्री 8 च्या दरम्यान जल्लोष करण्यात आला.

युवासेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील, बंडू पाटील, संतोष चव्हाण यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालत अभिवादन करण्यात आले. त्यानंतर एकमेकांना पेढे भरवित शिवसैनिकांनी आपला आनंद साजरा केला. फटाक्यांची आतिषबाजी करत व बँड बाजा वाजवीण्यात आला. यावेळी बँडच्या ठेक्यावर सर्वच पदाधिकाऱ्यांनी ठेका धरला.

युवासेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यावेळी म्हणाले,

शिवसेना वाढवण्यासाठी अनेक वर्ष कष्ट केले, केसेस घेतल्या, ज्यांनी मोर्चे काढले, आंदोलन केली त्यांचा आज हा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे चाललेले आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत.

आज त्यांच्या विचारांचा विजय झाला आहे. आज त्यांच्याबरोबर 40 आमदार 12 खासदार हे सर्व त्यांच्या बाजूने आहेत. आम्हाला सगळ्यांना आज प्रचंड आनंद झालेला आहे.

धनुष्यबाण त्यांच्या हातून गेल्यामुळे ते आता काहीही बरळतील - आमदार विश्वनाथ भोईर

शिवसेना नाव व चिन्ह मिळाल्यानंतर कल्याण मध्ये शिंदे गटाकडील कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळेस कल्याणच्या शिवाजी चौकात ढोल ताशा वाजवत एकमेकांची गळाभेट घेत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला.

तर महिला कार्यकर्त्यांनी ढोल ताशा च्या ठेक्यावर ताल धरत फुगडी घालून जल्लोष साजरा केला. यावेळी शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर हे देखील या जल्लोषामध्ये सामील झाले. यावेळेस विश्वनाथ भोईर यांनी संजय राऊत वरती जहरी टीका केली. यावेळी आमदार भोईर यांनी ठाकरे गटावर टीका केली.

धनुष्यबाण त्यांच्या हातून गेल्यामुळे ते आता काहीही बरळतील. संजय राऊत असतील किंवा आणखीन कोणी असू दे त्यांच्या बोलण्याने आम्हाला फरक पडत नाही. खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, पैसे आम्ही खर्च करू असे म्हणत त्यांनी टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT