crime 
मुंबई

मुंबईत शिवसेना नेत्यावर गोळीबार; रुग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील विक्रोळी भागात शिवसेना नेत्यावर आज (गुरुवार) सकाळी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात ते जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शेखर जाधव असे या  शिवसेना नेत्याचे नाव असून, त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विक्रोळी पूर्वेला असलेल्या टागोर नगर मधील साई मंदिर परिसरात आज सकाळी साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास हा गोळीबार झाला. 

शेखर जाधव यांच्या डाव्या खांद्यावर गोळी लागली असल्याची माहिती आहे. जाधव यांच्यावर 22 वर्षीय तरुणाने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या काही दिवसापासून शेखर जाधव यांना धमक्या येत असल्याची माहिती मिळत असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. शेखर जाधव हे शिवसेना उपविभागप्रमुख म्हणून गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी, पण ‘या’ भागांत मुसळधार सरी कोसळणार; आज तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

Indian Fishing Boat: भारतीय बोटीला अपघात; ११ मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने वाचवले, खवळलेल्या समुद्रात मध्यरात्री अनुभवला थरार..

Maratha Reservation: मनोज जरांगे कुणाच्या अजेंड्यावर काम करत होते? लक्ष्मण हाके यांचा खळबळजनक आरोप, संविधानाला आव्हान देऊ नका

GOBAR-DHAN Scheme : पेट्रोलमध्ये इथेनॉल नंतर आता CNG-PNG मध्येही बायोगॅस मिसळला जाणार, सरकारची मोठी घोषणा

Devendra Fadnavis: जात पडताळणी समितीत सरकारचा हस्तक्षेप नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT