मुंबई

SCकडून प्रताप सरनाईकांना दिलासा, ईडीला कारवाई न करण्याचे आदेश

पूजा विचारे

मुंबईः मनी लाँड्रिंग प्रकरणी  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.  मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचनालयानं (ईडीनं) कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं आमदार सरनाईक यांना मोठा दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयानं ईडीला कारवाई न करण्याचे आदेश दिलेत. टॉप ग्रुप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने 24 नोव्हेंबरला प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर छापेमारी केली होती. 

दिल्लीतून आलेल्या ईडीच्या पथकानं प्रताप सरनाईक यांना वारंवार चौकशीसाठी नोटीसा बजावल्या होत्या. त्यानंतर  ईडीच्या कारवाई विरोधात प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने प्रताप सरनाईक यांची बाजू उचलून धरत दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईडीला तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिलेत. एक प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तूर्तास कारवाई नाही, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. 

प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश दिले आहेत. ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवू शकते. मात्र त्यांना अटक करु शकत नाही, असं सर्वोच्च न्यायलयानं आपल्या आदेशात नमूद केलं आहे.

ईडीने 24 नोव्हेंबरला सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक मुंबईत नव्हते. ते भारताबाहेर होते.  प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते.

Shiv Sena MLA Pratap Sarnaik Money Laundering relief from Supreme Court

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT