kirit somaiya and narayan rane 
मुंबई

Shiv Sena : "पोपटलालची पोपटपंची बंद करु, राडा होणार" ; ठाकरे गटाच्या खासदाराचा गंभीर इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : माजी मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित कार्यालयावर झालेल्या कारवाईमुळे किरीट सोमय्या आणि परब यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. दुसरीकडे म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसैनिक वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात घुसले होते. जिथे त्यांनी मोठआ गोंधळ घातला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट इशारा दिला आहे. 

संजय राऊत म्हणाले, "असे राडे यापुढे होतील. जर खोट्या तक्रारी करुन गुन्हे दाखल करत असाल तर आम्ही राडे करुन खरे गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत. अनिल परबांच्या ज्या कार्यलयावर हातोडा मारला, मात्र ते त्यांचे कार्यालय नव्हते. हे म्हाडाने स्पष्ट केले तरी भाजपच्या मुलुंडचा पोपटलाल हा वारंवार बदनामीच्या मोहिमा राबवत आहे. त्या मोहिमा आता आम्ही थांबवू. काल राडा झाला त्याचे आम्ही स्वागत करतो. शिवसैनिक यापुढे अशाप्रकारचे राडे करतील. मी स्वत: किरीट सोमय्या आणि नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे."

पोपटलालची पोपटपंची बंद करु, असा इशारा देखील संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांनी दिला आहे. 

अर्थसंकल्पावर राऊत म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आज  २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आपला शेवटचा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे. हा अर्थसंकल्प येत्या काळात देशाची स्थिती आणि दिशा ठरवणार आहे. भारतात महागाईत घट नोंदवली गेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) देखील व्याजदरात वाढ रोखेल अशी अपेक्षा आहे. मात्र, या सगळ्यात जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यांनी आज जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. 

संजय राऊत म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या बाबतीत स्वतंत्र आणि वेगळी भूमिका घेणे गरजेचे आहे.  खास करुन मुंबईसाठी. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सतत मुंबईला येत आहेत. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाचे उद्घाटन करत आहेत. मुंबई महापालिका हे मोदींचे लक्ष आहे.

मात्र त्यांनी निवडणुकांसाठी नाही तर मुंबईसाठी काहीतरी घेऊन यावे. केंद्र सरकारच्या तिजोरीतला मोठा महाराष्ट्रातून जातो. त्यामुळे अर्थसंकल्पात आम्ही महाराष्ट्रासाठी काही मागण्या केल्या आहेत. त्या पूर्ण होतील ही अपेक्षा आहे. 

महाराष्ट्रातून अनेक रोजगार, प्रकल्प इतर राज्यात गेले. त्यामुळे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला जास्त अपेक्षा आहेत. अर्थसंकल्पात महाराष्ट्राची भरपाई झाली तर आम्ही केंद्र सरकारचे आभार मानू. हा पैसा भाजपचा नसून जनतेचा आहे, हा भाजपचा अर्थसंकल्प नाही, असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025 : बिहारच्या मतदार याद्यांमध्ये घोळ? आढळले चक्क नेपाळ, बांगलादेश अन् म्यानमारचे नागरिक

चाकूने वार करत डोकं भिंतीवर आपटलं!अभिनेत्रीला नवऱ्याने केली मारहाण, डोळ्यात मिरी पावडर फेकून केले वार

WHO Action : WHO कडून शेख हसीना यांना मोठा धक्का, मुलगी सायमा वाजिद यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; पदावरून केली हकालपट्टी?

Lumpy Affected:'साेलापूर जिल्ह्यात ९०० जनावरे लम्पीबाधित'; राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

Shravan 2025 Upvas Recipe: श्रावणात उपवासासाठी बनवा गरमागरम भगर-आमटी, जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT