मुंबई

'औरंगाबादच्या नामांतराच्या प्रयत्नात शिवसेनेला मोठा झटका बसेल'; संजय निरुपम यांचा इशारा

कृष्ण जोशी

मुंबई  ः औरंगजेबाचे व्यक्तिमत्व विवादास्पद असले आणि छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनकार्य वंदनीय असले तरी शिवसेनेने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मोठा झटका बसेल, असा इशारा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी दिला आहे. 

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या तापला असून त्यावरून आज निरुपम यांनी ट्वीट करून शिवसेनेला वरील इशारा दिला आहे. आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमाद्वारे चालत असले, कोणाच्या वैयक्तिक अजेंड्यासाठी नाही, असेही त्यांनी दाखवून दिले आहे. 

औरंगाबादचे नामांतर करण्याचा शिवसेनेचा जुनाच अजेंडा आहे. मात्र आता राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. हे सरकार किमान समान कार्यक्रमानुसार चालत आहे. कोणाचा वैयक्तिक अजेंडा पूर्ण करण्यासाठी हे सरकार चालत नाही. जनतेसाठी ठोस काम करण्यासाठी हा किमान समान कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. शहरांची नावे बदलण्यासाठी नाही, असे निरुपम यांनी दाखवून दिले आहे. 

औरंगजेबाचे व्यक्तित्व विवादास्पद राहिले आहे. त्याच्या प्रत्येक कृतीशी काँग्रेस पक्ष सहमत असण्याची जरुरी नाही. तर संभाजी महाराज महान योद्धा होते, त्यांचे जीवनकार्य वंदनीय होते, यावर कसलेही मतभेद नाहीत. मात्र सरकार चालविताना शिवसेनेने महापुरुषांना मधे आणले तर नक्कीच त्या पक्षाला मोठाच झटका बसेल ( शिवसेना यकीनन गच्चा खा जाएगी), त्यांनी स्वतःच एकदा काय ते नक्की करावे, असा इशाराही शेवटी निरुपम यांनी दिला आहे.

Shiv Sena will have to face huge losses on the issue of renaming Aurangabad - sanjay nirupam

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT