Adani Airports 
मुंबई

मुंबई विमानतळावर पुन्हा लागणार शिवाजी महाराजांच्या नावाचा बोर्ड

शिवसेनेच्या दणक्यानंतर विमानतळावर बोर्ड बदलण्याचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विमानतळावर (Mumabi internation airport) अदानी ग्रुपने (Adani Group) आपल्या ब्रॅण्डिंगचे बोर्ड बदलण्याचे काम सुरू केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून अदानी ग्रुपने अदानी विमानतळ अशा नावाचे फलक विमानतळ परिसरात लावल्याने संतप्त शिवसैनिकांनी (ShivaSena) सोमवारी राडा केला होता. दरम्यान, बोर्डाची तोडफोड करत विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज नावानेच ओळखले जावे, एखाद्या उद्योगपतीच्या नावाने ओळखले जाणार असेल तर मान्य नाही, अशी भूमिका शिवसेनेने मांडली होती.

त्यानंतर आता अदानी ग्रुपने विमानतळावरील अदानी विमानतळ लिहिलेले बोर्ड काढणे सुरू केले असून, आता फक्त अदानी ग्रुपचा लोगो आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नावाचे बोर्ड लावण्यात येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या टिकेनंतर अदानी ग्रुपने हे बदल करण्याचे काम सुरू केले आहे. 2 ऑगष्ट रोजी शिवसेनेने अदानी ग्रुपच्या व्यवस्थावकांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या होत्या.

त्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या नामफलकाचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे संबोधले जात असून, यापुढेही ही ओळख कायम रहावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT