संग्रहित  
मुंबई

रायगडावरील शिवपुण्यतिथी कार्यक्रम स्थगित 

सकाळ वृत्तसेवा

महाड : रायगड किल्ल्यावर गेल्या 125 वर्षांपासून तिथीप्रमाणे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात येतो. यानिमित्त रायगड किल्ल्यावर हजारोंच्या संख्येने शिवभक्‍त छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा मंडळाच्यावतीने गुरुवारी (ता.१२) हाेणारा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असून, शिवभक्तांनी शिवपुण्यतिथी घरीच साजरी करावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी केले आहे.

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्यावतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते. मात्र या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे अभिवादन कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याचे आंग्रे यांनी सांगितले. शिवपुण्यतिथीच्या दिवशी रायगडावर जाता येणे शक्‍य नसल्याने शिवभक्तांनी घरामध्ये योग्य अंतर ठेऊन शिवरायांच्या स्मृतीला वंदन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करावे. त्यांचे स्मरण करावे, शिववंदन करून त्यांना अभिवादन करावे. त्या दिवशी शिवचरित्रातील विविध पैलूंवर कुटुंबामध्ये चर्चा करावी, ज्या घरामध्ये लहान मुले असतील, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कथा सांगण्यात याव्यात, अशाप्रकारे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा शिवभक्‍तांनी अभ्यास करावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंचे आदेश मनमानी करणारे अन् एकतर्फी, FDA कारवाईविरोधात हायकोर्टात याचिका दाखल

Gold Rate Today: 2 दिवसांच्या तुफान वाढीनंतर सोनं घसरलं! महाराष्ट्रात आज 24, 22 आणि 18 कॅरेटचा भाव किती?

Latest Marathi Live Update: राष्ट्रीय कामाच्या नावाखाली शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम

Buddha Vihar Fund Controversy : थिबाराजाकालीन बुद्धविहारासाठी मंजूर झालेल्या कोट्यवधींच्या निधीवरून पेटला वाद; थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?

Koyna Dam Water Storage Latest Update : कोयना धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली! येत्या काही दिवसांत विसर्ग? महाबळेश्वरसह नवजात धुवांधार पाऊस, पाहा आजचा पाणीसाठा

SCROLL FOR NEXT