Shivrajyabhishek in Burj Khalifa Dubai sakal
मुंबई

Shivrajyabhishek in Dubai : बुर्ज खलिफा दुबई येथे शिवराज्याभिषेक! जगातील सर्वात उंच इमारतीत अनोखा सोहळा साजरा

'या' सहकाऱ्यांनी दुबई येथे शिवराज्याभिषेक सोहळा आयोजीत केला होता.

शर्मिला वाळुंज

Shivrajyabhishek in Dubai - दुर्गराज रायगडा पासून ते जगातील काना कोपऱ्यात यंदाचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातच नाही तर जगातील सर्वात उंच इमारत दुबईतील बुर्ज खलिफा येथे देखील शिवभक्तांनी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला. या सोहळ्याचा आनंद दुबईस्थित डोंबिवलीकर चंद्रशेखर

जाधव यांनी सर्व भरतीयांसोबत शेअर केला आहे. सौदी अरेबीयातील आणि जगभरातील आकर्षण असलेल्या बुर्ज खलिफा या दुबई येथील इमारतीवर शिवभक्तांनी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला. जगातील सर्वात उंच इमारत असा नावलौकिक असलेल्या बुर्ज खलिफा या दुबईतील इमारतीच्या परिसरात दुबईतील मराठी बांधवांनी मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला.

मराठी बांधवांसाठी दरवर्षी शिवजयंतीचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर जाधव, त्यांचे सहकारी करत असतात. या सहकाऱ्यांनी दुबई येथे शिवराज्याभिषेक सोहळा आयोजीत केला होता. यावेळी टूर्स व ट्रॅव्हल्सची नवीन संस्था स्थापन करून त्याचे अनावरण शिवराज्याभिषेक दिना निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजन करून करण्यात आले. जाधव यांनी नवीन संस्थाचे डॉक्युमेंट्स छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण केले.यावेळी संदीप शिंपी, संदीप पवार, प्रशांत शिंपी व त्यांचे परिवार सामील झाला होता.

दूर देशी राहून देखील शिवरायांची शिकवण व प्रेरणा देणारा व शिवभक्ती जपणारा असा अनोखा सोहळा उत्साहात साजरा झाला. दुबई येथे 18 जूनला छत्रपती मराठा साम्राज्य याच्या तर्फे यंदा मोठ्या प्रमाणावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजीत करण्यात येणार आहे. दुबईतील सर्व शिवभक्तांना या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे मोफत आनंद घेता येणार आहे असे चंद्रशेखर जाधव यांनी नमुत केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: कोंढवे धावडे परिसरात मुसळधार पावसाने महापालिकेच्या व्यवस्थापनातील त्रुटी उघड

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

SCROLL FOR NEXT