मुंबई

भाजपची 'किंगमेकर' शिवसेनेकडे मिनतवारी..

सकाळ वृत्तसेवा

"मी पुन्हा येईन"..  निवडणुकीपुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आता भाजपला शिवसेनेची मिनतवारी करावी लागणार आहे. कारण शिवसेनेच्या मदतीशिवाय आता भाजपला सत्ता स्थापन करता येणं अशक्य आहे. कारण भाजपकडे १०५ आमदार असून सत्तास्थापनेसाठी त्यांना आणखी ४० आमदारांची गरज आहे. अपक्ष आमदारांची संख्या २४ असून या सर्वांची साथ जरी भाजपला मिळाली असली तरीही भाजपला सत्ता स्थापन करणं अशक्य आहे.

याउलट शिवसेनेकडे ५६ आमदार असून सेनेची साथ मिळाल्यासच भाजपला सत्ता स्थापन करणं शक्य आहे. मात्र शिवसेनेने आता आपला सूर बदललाय. एकिकडे भाजप सेनेच्या पाठिंब्याकडे लक्ष लावून असतानाच काँग्रेसने मात्र थेट शिवसेनेला पाठिंब्याचे संकेत दिलेत. 

शिवसेनेकडे असलेल्या ५६ आमदारांना काँग्रेसच्या ४४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांची साथ मिळाल्यास १५४ जागांसह शिवसेना सत्ता स्थापन करू शकते. 

त्यामुळे कधी नव्हे ते शिवसेना सध्या किंगमेकरच्या भुमिकेत आहेत. आता पाहायचं एवढंच की शिवसेना नवी सत्ता समिकरणं जुळवणार की पुन्हा एकदा भाजपसोबत जात राज्याच्या राजकीय पटलावर लहान भाऊच राहणं पसंत करणार.

WebTitle : shivsena become kingmaker in mharashtra 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

SCROLL FOR NEXT