मुंबई

पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का; मानखुर्दमध्ये शिवसेनेचा झेंडा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई महानगर पालिकेत मानखुर्द प्रभाग क्रमांक १४१ मध्ये पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकांचे निकाल समोर आलेत. या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारलीय. शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांनी ४ हजार ४२७ मतं मिळवत भाजपच्या बबलू पांचाळ याना हरवलं आहे. 

मुंबईतील मानखुर्द प्रभाग क्रमांक १४१ मध्ये पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडलं होतं. यानंतर आज निकाल समोर आलेत. या निवडणुकीची विशेष बाब म्हणजे या निवडणुकीमध्ये तब्बल अठरा उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. 

या निवडणुकीत विठ्ठल लोकरे यांनी  १ हजार ३८५ मतांनी विजयी होत भाजपच्या बबलू पांचाळ याना हरवलं आहे. विठ्ठल लोकरे यांना एकूण ४ हजार ४२७ मतं पडली, तर बबलू पांचाळ यांना ३ हजार ०४२ मतं पडली. विठ्ठल लोकरे हे या आधी याच मतदारसंघातील नगरसेवक होते. मात्र विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता.  

मतदारांचे आभार

विजयी झाल्यावर विठ्ठल लोकरे यांची प्रतिक्रिया दिली. हा विजय उद्धव ठाकरे यांना ही भेट असून पुढच्या निवडणूकांमध्ये भाजपच्या जागा कमी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विठ्ठल लोकरे यांनी गेली पंचवीस वर्ष त्यांच्यासोबत असलेल्या मतदारांचे देखील आभार मानलेत.

कोण आहेत विठ्ठल लोकरे

विठ्ठल लोकरे हे २०१७ मध्ये महापालिका निवडणूक लढवत विजयी झाले होते. मात्र विधानसभा लढवण्यासाठी त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आणि ते शिवसेनेच्या गोटात सामील झालेत. शिसवणेकडून त्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. मात्र विधानसभेत त्यांना यश मिळालं नव्हतं. अशात मानखुर्द प्रभाग क्रमांक १४१ च्या रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत विठ्ठल लोकरे विजयी झालेत 

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. याचा फायदा शिवसेनेला मुंबईत झालेला पाहायला मिळतोय. शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांनी मिळवलेल्या यशामुळे त्याचा फायदा शिवसेनेला मुंबई महानगर पालिकेत होताना पाहायला मिळेल. त्यामुळे आता  शिवसेनेचं पालिकेतील बळंही वाढलं आहे.

shivsena candidate viththal lokare won from mankhurd in bmc by poll elections

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT