Jyoti Waghmare 
मुंबई

Dasara Melava: "कोण कुठली ती अक्काबाई....."; सुषमा अंधारेंवर ज्योती वाघमारेंचा शेलक्या शब्दांत हल्लाबोल

आझाद मैदानात शिंदे गटाच्या मेळाव्यात वाघमारे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर सडकून टीका केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे सध्या मुंबईत पार पडत आहेत. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला.

कोण कुठली ती अक्काबाई असं म्हणतं त्यांनी उद्धव ठाकरेंवरसह संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला. (ShivSena Dasara Melava Azad Maidan Eknath Shinde Jyoti Waghmare criticism of Sushma Andharen in harsh words)

कोण कुठली आक्काबाई?

ज्योती वाघमारे म्हणाल्या, "लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी सावित्रीच्या लेकीला लखपती बनवण्याची योजना सुरु केली. आज तिकडच्या मंचावर कोण उभी आहे? कोण कुठली ती अक्काबाई! दसरा आई-भवानीचा उत्सव. (Latest Marathi News)

दसरा महिषासूर मर्दिनीची उत्सव आणि आज या दसरा मेळाव्याच्या पावन स्टेजवरुन उद्धव ठाकरेंना सवाल करायचा आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुमचं राजकारण होत असेल तर या महाराष्ट्राच्या बापाला बाळासाहेब ठाकरेंना थेरडं म्हणणारी सुषमा अक्का तुमच्या शिवसेनेचा चेहरा कशी काय होऊ शकते? अरे काय म्हणते ती बाई अचकटविचकट हावभाव करत काय म्हणते? बायका चप्पल घालत नाहीत! बायका जीवाला काही खात नाहीत! आणि मी विचारलं तर म्हणतात कशा आई बसली! आईच बसते का बाप बसत नाही का कधी?"

...तर थू तुमच्या जिंदगानीवर

"छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत असणारी आई तुळजाभवानी. महाराष्ट्राची आई तुळजाभवानीबद्दल अचकटकविचकट हावभाव करुन बोलणारी ही बाई जर उद्धव ठाकरे तुमच्या शिवसेनेचा चेहरा असेल तर थू तुमच्या जिंदगानीवरती. (Marathi Tajya Batmya)

जर तुम्ही अशा बाईच्या पदरात राजकारण चालवत असाल. कोण कुठला शर्जिल उस्मान?, कोण कुठला ओवैसी? औरंगजेबाच्या कबरीवर फुलं उधळतो तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही. हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या या लोकांना तुम्ही शिवसेनेत सन्मानाचं स्थान देत असाल!

जर सिल्व्हर ओकची आणि सोनिया गांधींची गुलामगिरी करुन तुम्ही राजकारण करत असाल तर माझा तुम्हाला सल्ला आहे की ठाकरे आडनाव लावण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुम्ही यापुढे वाकरे आडनाव लावा. कारण या लोकांपुढे वाकण्यात तुमची जिंदगी गेली आहे"

आम्हाला हिंदुत्व सांगू नये

"कोण कुठला संजय राऊत तो म्हणतो डुप्लिकेट माल! तु आधी स्वतःचं इमान तपासून बघ. या संजय राऊतला तर वेड्यांच्या इस्पितळात नेऊन शॉक ट्रिटमेंट देण्याची गरज आहे. कुंक धन्याचं आणि मंगळसूत्र गण्याचं असा त्यांचा कारभार आहे. भाकरी मातोश्रीची पण चाकरी शरद पवारांची असं करणाऱ्या या संजय राऊतांनी आम्हाला हिंदुत्व सांगू नये.

ओसाड नगरीचा युवराज आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं. तुझी नाईट लाईफ मौज मस्तीची. पेंग्वीन आणणारा मर्द नसतो तर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारी वाघनखं आणणारा मर्द असतो, ते धाडस एकनाथ शिंदेंनी दाखवला, अशा शब्दांत ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर सडेतोड हल्ला केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT