मुंबई

Dasara Melava: "2004 पासूनच मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसायचं होतं, पण..."; शिंदेंचा ठाकरेंबाबत खळबळजनक दावा

आझाद मैदानावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा सुरु आहे. यावेळी एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टार्गेट केलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : आझाद मैदानावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा सुरु आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधित करताना ठाकरेंना टार्गेट केलं. सन २००४ पासूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायचं पण त्याचा जुगाड लागत नव्हता, असा खळबळजनक दावा यावेळी शिंदेंनी केला. (ShivSena Dasara Melava Azad Maidan Mumbai News Eknath Shinde Vijayadashami)

पवारांकडं दोन माणसं पाठवली

शिंदे म्हणाले, खरं म्हणजे बाळासाहेबांना मी शब्द दिला म्हणाले शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री बनवणार. शिवसैनिकाला पालखीत बसवणार. आम्ही सगळे विचार करु लागलो, कुठल्या शिवसैनिकाला बसवणार. कुणाला संधी मिळणार. पण हे महाशय टुमकन उडाले आणि टुमकन त्या खुर्चीत जाऊन बसले. (Latest Marathi News)

मागचं-पुढचं सगळं सोडलं आणि मला म्हणाले मला कुठं व्हायचंय! पवार साहेबांनी सांगितलं. पण पवार साहेबांकडं दोन माणसं पाठवली तुम्ही आणि उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस करा म्हणून पवार साहेबांना विनंती केली हे कधी लपत नसतं.

मुख्यमंत्रीपदावर बसायचं होतं

तुमचं तर २००४ पासूनच बसायचं ठरलं होतं. रामदास कदम, गजानन किर्तीकरांना हे माहिती आहे. पण त्यांचा जुगाड लागत नव्हता. जसे विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आले न् आले लगेच त्यांनी सांगितलं की आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत. अरे तुम्ही युतीमध्ये लढले, दुसरे कसे काय दरवाजे शोधायला लागले. म्हणजेच त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं पण दाखवायचं नव्हतं. (Marathi Tajya Batmya)

अनेक चेहरे दडलेत

उद्धव ठाकरेंकडं एक चेहरा आहे पण त्यामागे अनेक चेहरे दडलेले आहेत. त्यामुळं भोळेपणानं जे तिकडे आहेत त्यांनी सावध व्हावं. चेहऱ्यावर जाऊ नका अरे पोटातलं पाणी देखील हालू दिलं नाही त्यांनी. पोटात एक ओठात एक असं आमचं काम नाही.

पण मी त्याचा साक्षीदार आहे. अरे शेवटपर्यंत कळून दिलं नाही. चेहऱ्यावर दाखवलं नाही, हीच तर खरी कमाल आहे. हे आपल्याला जमत नाही. सीतेचं हरन करण्यासाठी रावणानं साधूचं रुप धारणं केलं होतं. तो साधू म्हणजेच मुख्यमंत्री बनण्यासाठी जे संधीसाधू बनले ते उद्धव ठाकरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Beed News: रेल्वे, ‘स्वस्थ नारी’चे बीडमधून उद्‍घाटन; अजित पवार आज बीडमध्ये, बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणार विविध कार्यक्रम

Solapur News: सोलापूर काँग्रेसच्या मातृसत्ता हरपली! माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन

SCROLL FOR NEXT