Uddhav Thackeray Aaditya Thackeray  Sakal
मुंबई

Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यात ठाकरे परिवार हुकुमाचा एक्का बाहेर काढणार? नव्या पोस्टरची चर्चा

ठिकाणाबद्दल वाद असूनही पोस्टरवर शिवाजी पार्कचाच पत्ता देण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेचा दसरा मेळावा एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली होणार की उद्धव ठाकरेंच्या, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सध्या राज्यभरात दसरा मेळाव्याचीच चर्चा आहे. दादरमधल्या शिवाजी पार्कवर कोण दसरा मेळावा घेणार हे अद्याप ठरलेलं नसलं तरीही आता शिवसेनेकडून मेळाव्याचे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहे. यामध्ये तेजस ठाकरेंचा फोटो दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेनेने आता दसरा मेळाव्याचे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरेंचाही फोटो लावण्यात आला आहे. तसंच या पोस्टरवर दसरा मेळाव्याचा पत्ता शिवाजी पार्क हाच देण्यात आला आहे. त्यामुळे आता दसरा मेळाव्याच्या निमित्ताने तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होण्याची चर्चा सध्या होऊ लागली आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे लाँच होणार असल्याचं दिसत आहे.

या पोस्टरमधून "आता ताकद दाखवणारच, गद्दारांना क्षमा नाही, चलो शिवतीर्थ" असा संदेशही देण्यात आला आहे. दसरा मेळाव्याची जागा अद्यापही ठरलेली नाही. शिवाजी पार्कवर होणार की आणखी कुठे याबद्दलची चर्चा आता सुरू आहे. यापूर्वीही दसरा मेळाव्याचे पोस्टर शिवसेनेकडून प्रसारित करण्यात आले होते. जर शिवाजी पार्क मिळालं नाही, तर रस्त्यात उभं राहून भाषण करण्याची तयारीही उद्धव ठाकरेंनी दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

जमिनीतून गूढ आवाज अन् भूकंपाचे धक्के; नागरिकांनी थेट घराबाहेर घेतली धाव, हिंगोलीतील प्रकार

Shubman Gill ने भारताच्या टी२० संघात कमबॅकवर अखेर सोडलं मौन; GT ला फायनलमध्ये नेल्यावर म्हणाला, 'जर माझी निवड...'

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT