Sanjay Raut 
मुंबई

ShivSena Dhadak Morcha: "मुंबई महापालिकेचा सातबारा शिवसेनेच्या नावावर"; राऊतांचं भाजप-शिवसेनेला आव्हान

मुंबईतील भ्रष्टाचाराविरोधात ठाकरे गटानं मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबईतील भ्रष्टाचाराविरोधात ठाकरे गटानं मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. यावेळी खासदार संजय राऊत यांनी या मोर्चात उपस्थित जनतेला संबोधित केलं. मुंबई महापालिकेचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना-भाजपला आव्हान दिलं आहे. (Shiv Sena Thackeray group Dhadak Morcha at BMC headquarters)

राऊत म्हणाले, "महाराष्ट्र नव्हे तर या देशाचं तरुण नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात हा अती विराट मोर्चा धडकला आहे. सूर्य उगवला आहे, सगळ्यांना वाटत होतं पाऊस पडेल, मोर्चा काय होईल. पण पाऊस पडला तो शिवसैनिकांचा आपल्याला आशीर्वाद द्यायला देवताही आले आहेत. त्यामुळं आम्हाला केवळ जनतेचेच नव्हे तर ३३ कोटी देवदेवतांचे आशीर्वाद आहेत. बरंजगबली कर्नाटकात मोदींना पावला नाही, पण याच बजरंगानं आदित्य़ ठाकरेंना गदा दिली आहे, आता हीच गदा महापालिकेत फिरवायची आहे. मग हे चोर आणि चोरावरचे मोर कसे बिळात जाऊन बसतात पाहा" (Latest Marathi News)

भाजपाची खास करुन मोदी-शहा, फडणवीस आणि मिंधे यांची एकच इच्छा आहे की भ्रष्टाचार करायचा असेल तर आमच्या पक्षात या. पण आज लाखो लोक याविरोधात एकत्र जमले आहेत. मुंबईकर म्हणताहेत आत्ता निवडणुका घ्या चोर कोण आणि शोर कुणाचा हे कळेल. माझं आव्हान आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना की त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून मोर्चा पहावा तुमची बुब्बुळ बाहेर येतील, असंही राऊत यावेळी म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

मुंबईवरील भगवा उतरवण्यासाठी दिल्लीतील २ डोके आणि महाराष्ट्रातील ४० खोके प्रयत्न करत आहेत. त्यांना ठोकायला हा मोर्चा काढला आहे. महाराष्ट्रावर मुंबईवर शिवसेनेचं कायम वर्चस्व राहिलं हे सांगणारा हा मोर्चा आहे. मुंबई महापालिकेचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे, अशी शब्दांत संजय राऊत यांनी यावेळी शिवेसना-भाजपला आव्हान दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT