शिवसेना 
मुंबई

शिवसेना आमदाराने नालेसफाई कंत्राटदाराला बसविले कचऱ्यात

नामदेव कुंभार

आठवडाभरापासून मुंबई आणि उपनगरात पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होते. नालेसफाईवरुन विरोधकांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांकडून टीकास्त्र सुरु असतानाच चांदीवलीच्या शिवसेनेच्या आमदार दिलीप लांडे यांना चक्क कंत्राटदाराला नाल्याच्या कचऱ्यात बसवल्याचं समोर आलं आहे. चांदीवली येथील संजयनगर भागात मोठया प्रमाणत नाले तुंबलेले होते. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यावर स्थानिक आमदार दिलीप लांडे पोहचले होते. लांडे यांनी यावेळी आपल्यासोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणलं होतं. या कार्यकर्त्यांनी नालेसफाई सुरू केली. यावेळी नालेसफाईचं कंत्राट दिलेल्या पालिकेच्या कंत्राटदारालाही लांडे यांनी बोलवलं होतं.

आमदार लांडे यांनी नालेसफाईचं कंत्राट असलेल्या कंत्राटदाराला त्या कचऱ्यात बसवलं. हा कचरा इथं का ? असा जाब विचारत लांडे यांनी कंत्राटदारालाच कचऱ्यात बसवलं. लोकांना होणारा त्रास कंत्राटदाराला समजावा, या हेतूनं बसवल्याचं लांडे यांनी सांगितलं.

दरम्यान, एकीकडे महापौर संपूर्ण नालेसफाई झाल्याचं प्रसारमाध्यमांना सांगत आहेत. त्यावेळीच दुसरीकडे शिवसेनेच्या आमदराला कंत्राटदाराला नाल्याच्या तुंबलेल्या कचऱ्यात बसविण्याची वेळ आल्याचे दिसत आहे. यावरुन आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Election 2025 : शहर पक्षी निवडणुकीवर स्थलांतरित पक्ष्यांची नजर; बॅलेटसह डिजिटल प्रचारावर भर, कुठं सुरु आहे निवडणूक?

IND vs SA: संघ निवड ते अष्टपैलू खेळाडूंचा हट्ट... भारतीय संघाला द. आफ्रिकेविरुद्ध व्हाईटवॉश मिळण्यामागची ५ कारणे

Chandrashekhar Bawankule: वाईच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देऊ: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; भाजपच्या उमेदवाराला साथ देण्याचे आवाहन

Latest Marathi News Live Update : : माजी आमदार निर्मला गावित यांच्या अपघातामागे कोणताही कट नाही - पोलिस

26/11 Mumbai Attack: सीएसएमटीची सुरक्षा एका मशीनवर, टर्मिनसवर एकच स्कॅनर; २६/११ सारखा हल्‍ला झाल्‍यास प्रत्‍युत्तर देणार कसे?

SCROLL FOR NEXT