मुंबई

ShivSena MLA Disqualification: आजची सुनावणी संपली! ठाकरेंची कागदपत्रं खोटी असल्याचा जेठमलानींचा दावा; 'ही' दिली कारणं

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणीला वेग आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आजपासून पाच दिवस सुनावणी होणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणीला वेग आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आजपासून पाच दिवस सुनावणी होणार आहे. आजच्या पहिल्या दिवसाची सुनावणी संपली असून आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी झाली.

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ही उलटतपासणी घेतली. तसेच ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात सादर केलेली कागदपत्रं ही खोटी असल्याचा दावाही त्यांनी केला. (Shivsena MLA Disqualification Mahesh Jethmalani claim that Uddhav Thackeray group documents are fake)

जेठमलानींनी नेमकं काय म्हटलंय ?

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाची कागदपत्रे तपासली असून ती बनावट असल्याचा दावा त्यांनी केला. जेटमलानी म्हणाले, जेवढी कागदपत्रं ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्षांसमोर सादर केली आहेत ती सर्व बनावट आहेत. (Marathi Tajya Batmya)

तसेच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या आमदारांची जी कागदपत्रे दिली आहेत, ज्यात त्यांनी शिंदेंच्या आमदारांनी सह्या केल्याचा दावा केला आहे तो देखील खोटा असल्याचं जेठमलानी यांनी म्हटलं.

ठरावाची प्रत कुठे?

ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्रातील ठरावाची प्रत कुठे आहे? असा सवाल जेठमलानी यांनी सुनावणी दरम्यान केला. तसेच बोगस अपात्रता याचिकेसाठी असा ठरावच झाला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. तर शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची ठरावावरची सही वेगळी असल्याचा दावाही जेठमलानी यांनी केला. (Latest Marathi News)

पक्षप्रमुखपद अस्तित्वात नाही

तसेच शिवसेनेची जी घटना आहे ती सन १९९९ ची असून ती सध्या निवडणूक आयोगाकडं आहे. या घटनेनुसार, पक्षप्रमुख हे पदचं अस्तित्वात नाही. त्यामुळं जेठमलानी यांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरेंकडून पक्ष प्रमुख म्हणून जे काही केलं गेलं आहे, ते पण चुकीचं आहे कारण असं कुठलंही पदच अस्तित्वात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

ICC Women’s World Cup 2025 Points Table: भारताच्या पोरींनी शेजाऱ्यांना त्यांची जागा दाखवली, पाकिस्तानची गुणतालिकेत गोची केली

Latest Marathi News Live Update : महायुती सरकारचा 'आनंदाचा शिधा' बंद शक्यता, कारण काय?

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

SCROLL FOR NEXT