Sanjay Raut and Kirit Somaiya टिम ई सकाळ
मुंबई

उद्योगपती आत्महत्या करण्यापूर्वी सोमय्यांना भेटले, राऊतांचा आरोप

ओमकार वाबळे

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. सोमय्यांवर खंडणी आणि वसुलीचे गुन्हे दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. सोमय्यांना स्वप्नात बंगले दिसतात. ते त्यांचे बेनामी बंगले असतील.

सोमय्यांनी स्वत: बेनामी मालमत्ता जमवली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. हा भूताटकीचा प्रकार आहे. भाजपच्या लोकांना भूताटकीने झपाटलंय. मी याआधीही सांगितलं आहे, सोमय्या आरोप करत असलेले बंगले त्या ठिकाणी नाहीत. संबंधित जागेवर कोणतंही बांधकाम नाही, असं त्यांनी म्हटलं. (Sanjay Raut Alleges Kirit Somaiya over Anvay Naik Death)

सोमय्या आरोप करत असलेल्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक आहेत. मात्र, त्यांना आत्महत्या का करावी लागली, यावर भजप काहीच बोलत नाही. नाईक यांना ज्यामुळे आत्महत्या करावी लागली, त्यांना मारणाऱ्या लोकांना भाजपवाले वाचवत होते. अर्णब गोस्वामीला भाजपच्या लोकांनी पाठिशी घातलं. आणि माझ्याकडे अशीही माहिती आहे की, किरीट सोमय्यांनी नाईक यांना धमक्या दिल्या.

सोमय्यांनी अन्वय नाईकांना दोन वेळा बोलावलं होतं. आणि त्यानंतरच नाईकांनी आत्महत्या केली. महाराष्ट्र आणि मुंबईतून मराठी माणसाला संपवण्याचा हा प्रयत्न आहे. नाईक यांच्यासारख्या मराठी उद्योजकांना संपवण्याचा प्रयत्न भाजपांनी केला आहे. सोमय्या चोर आणि लफंगा व्यक्ती आहे, अस राऊत यांनी म्हटलं. त्यांचा खेल खल्लास होत आहे...सोमय्या कोर्लई नाही, तर तुरुंगाच्या दिशेने पळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT