Sanjay Raut ANI
मुंबई

'अनिल देशमुखांवर धाडी, एफआयआर वगैरे अतिरेक'

कुछ तो गडबड है...

दीनानाथ परब

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने FIR दाखल केला आहे. सीबीआयने केलेल्या या कारवाईवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे.

"मुंबई उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुखावर धाडी, एफआयआर वगैरे अतिरेक आहे" असे संजय राऊत यांचे मत आहे.

वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवरुन अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या निर्णयाचे वकील जयश्री पाटील यांनी स्वागत केले आहे.

जयश्री पाटील काय म्हणाल्या?

"मी आधीच सांगितलं होतं, अनिल देशमुख ही मोगलाई नाही. तुम्ही मुगलांसारखे भ्रष्टाचार करुन या देशाला लुटू शकत नाही. हे संविधानाच, भारतीय कायद्याचं राज्य आहे. भारतमातेची अशा प्रकारे लुट करुन सुटू शकत नाही. तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. सीबीआयने एफआयआर दाखल केलाय तो सिद्ध झालाय ही महाराष्ट्राच्या जनतेची जीत आहे. बिझनेसमनकडून लुट सुरु होती, त्या सगळयांची जीत आहे" अशी प्रतिक्रिया जयश्री पाटील यांनी दिली.

तपासात सीबीआयला कसं सहकार्य केलं, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, "मी सीबीआयला मलबार हिल पोलीस स्टेशनची कॉपी दिली. चौकशीत मदत केली. पुरावे सादर केले. म्हणून सीबीआयने गुन्हा दाखल करुन छापेमारी केली." "अनिल देशमुख यांना अटक झालीच पाहिले, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत" असे जयश्री पाटील म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांच्या मोबाईलचेही सुरु राहणार कॅमेरे; प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही, यंदा प्रथमच पर्यवेक्षकांची सरमिसळ

Morning Breakfast Recipe: प्रथिनेयुक्त नाश्ता बनवायचा असेल तर मुगापासून बनवा हा खास पदार्थ, अगदी सोपी आहे रेसिपी

Shiva Shakti Temple: भारताची एकमेव जागा जिथे शिव आणि शक्ती एकत्र दर्शन देतात, कुठे आहे हे पवित्र स्थळ पहा

INDW vs SAW, 1st T20I: जेमिमाह रोड्रिग्सचं शानदार अर्धशतक, स्मृती मानधनाचीही मिळाली साथ; भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

Accident News:'अपघातात आर्टिकामधील तिघे ठार तर दोन जखमी'; धरणगाव-धुपेश्वर रोडवरील घटना, चालकाचे नियंत्रण सुटल अन्..

SCROLL FOR NEXT