shiv sena leader arvind sawant resigns as central minister quits with nda 
मुंबई

कोणाच्याही पाठित खंजीर न खुपसण्याचा शिवसेनेचा इतिहास आहे - अरविंद सावंत

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये विश्वासाचा दोर आहे.

वैदेही काणेकर

मुंबई: "'राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या भेटीतून राजकीय अर्थ न काढता, देशाच्या हितासाठी असा सुसंवाद साधणं महत्त्वाचं आहे" असं शिवसेना खासदार आणि प्रवक्ते अरविंद सावंत (arvind sawant) म्हणाले. (Shivsena never back stab anyone arvind sawant dmp82)

"मागच्याच आठवड्यात दलाई लामांचा वाढदिवस झाला. चीनचं सैन्य सिंधू नदीच्या पलीकडे आपल्या भागात येऊन लाल झेंडे दाखवून घोषणा दिल्या. चीनने आणखी कारवाया सुरु केल्या आहेत. लेह-लडाखमध्ये बांधकाम सुरु केलय. शरद पवार हे देशाचे संरक्षणमंत्री आणि कृषाीमंत्री होते. दोन्ही विषय तापलेले आहेत. शेतकऱ्यांच आंदोलन आणि चीनच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. या दोन विषयांवरुन मोदी आणि शरद पवारांमध्ये बैठक झाली. त्यातून राजकीय अर्थ न काढता देशाच्या हितासाठी असा सुसंवाद महत्त्वाचा आहे" असं अरविंद सावंत यांनी सांगितलं.

"काल छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांना भेटले. ओबीसी आरक्षणासंदर्भात ही भेट घेतली. प्रश्न सुटले पाहिजेत. सुसंवाद साधून प्रश्न मार्गी लागला पाहिजे हा त्यामागे उद्देश असतो" असे सावंत यांनी सांगितले. "महाविकास आघाडी सरकारबद्दल सातत्याने तर्क-वितर्क लढवण्यात आलेत. सरकार पडणार, याबद्दल वेगवेगळे तारखा सांगितल्या गेल्या. पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये विश्वासाचा दोर आहे. खासकरुन कोणाच्याही पाठित खंजीर न खुपसण्याचा शिवसेनेचा इतिहास आहे, हे लक्षात ठेवा. हा सुसंवाद जनतेच्या हिताचा आहे. त्यातून राजकीय तर्क-वितर्क काढू नका" असे अरविंद सावंत यांनी सांगितलं.

"मी तर म्हणतो, माध्यमांची श्वेतपत्रिका काढली पाहिजे, त्यांनी भाकितं वर्तवली, त्याचं पुढे काय झालं? २०२४ पर्यंत वाट बघा. राज्यात सरकार उत्तम काम करणार जनहिताची कामे करणार, उद्धव ठाकरे देशात एक नंबरचे मुख्यमंत्री ठरले हे विसरु नका, महाराष्ट्रात कोणतीही राजकीय उलथा-पालथ होणार नाही" असा दावा अरविंद सावंत यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT