Sanjay Raut  File Photo
मुंबई

मुख्यमंत्री ठाकरे-पंतप्रधान मोदी भेटीवर संजय राऊत म्हणतात...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी-ठाकरे यांची दिल्लीत भेट

विराज भागवत
  • मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी-ठाकरे यांची दिल्लीत भेट

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मराठा उपसमितीचे अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) हे आज दिल्लीत आहेत. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर या आरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेटणार आहेत. या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. (Shivsena Sanjay Raut Reaction on CM Uddhav Thackeray PM Modi Meeting on Maratha Reservation)

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण आज पंतप्रधानांची भेट घेत आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावरून ही भेट होत आहे. त्यामुळे यात कोणताही राजकीय पक्षीय बलाबलाचा प्रश्न नाही. मुख्यमंत्री आरक्षणाच्या बाबतीत खूप काळजीपूर्वक काम करत आहेत. महाराष्ट्रात या विषयावरून आंदोलन होत आहेत. मोर्चे काढले जाताहेत. याच मुद्द्यावर काल शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांचीही भेट झाली. महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याला वाटतं की मराठा आरक्षणाचा मुद्दा ताणला जाऊ नये. त्यामुळे आजच्या बैठकीत हा मुद्दा घेऊन गंभीरतेने चर्चा होईल आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी चर्चा होईल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उत्तर महाराष्ट्र दौरा-

"लवकरच आमचा उत्तर महाराष्ट्राचा 6 ते 7 दिवसांचा दौरा सुरू होणार आहे. आता पक्षबांधणी मजबूत करणं गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही दौरे करतोय. शिवसेनेचे संघटन मजबूत असणं आणि पक्षाचा विस्तार करणे आमचं कर्तव्य आहे. ते आम्ही नक्कीच करू", अशी माहिती त्यांनी दिली.

राहुल गांधी आणि लसीकरण-

"राहुल गांधी यांनी लसीकरणाच्या कार्यक्रमावर टीका केली आहे. गांधी यांची एक वेगळी शैली आहे. त्यात नेहमीच तथ्य असतं. कोरोना असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, ते ज्या-ज्या गोष्टींबद्दल बोलले होते, त्या बऱ्यापैकी खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे सरकारने त्यांच्या वक्तव्याचा गांभीर्याने विचार करावा", असेही राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT