मुंबई

Mumbai Rains : मुंबई तुंबली, राऊतांना शायरी सुचली; पूर तर रशियातही येत असल्याचेही वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईची पुर्ण तुंबई झालेली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही अवघ्या काही तासांमध्ये मुंबईत पाणी साठल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, या सर्व गोंधळामध्ये शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांचा शायराना अंदाज ट्विटरवर पहायला मिळत आहे.

तसेच, बेजबाबदारपणे वक्तव्य करत पूर तर रशियामध्ये येत असल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटल्याने त्यांनी नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. मुंबईतील पूरग्रस्त परिस्थितीला महापालिकेला जबाबदार ठरवता येणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

सत्ताधारी शिवसेनेने केलेले मान्सून पूर्व तयारीचे सर्व दावे फोल ठरत असल्याची टिका विरोधक करत आहेत. मात्र संजय राऊत यांनी विरोधकांना उत्तर देण्याऐवजी ट्विटवरुन या पावसासंदर्भात एक शायरी पोस्ट केली आहे. ‘कुछ तो चाहत रही होगी इन बारिश की बूँदों की भी, वर्ना कौन गिरता है इस जमीन पर आसमान तक पहुँचने के बाद!’ या ओळी राऊत यांनी ट्विट केल्या आहेत.
 

सोमवारपासून सतत पडत असणाऱ्या आणि आज सकाळ जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असतानाच दुपारी एक वाजताच्या सुमारास राऊत यांनी ही शायरी पोस्ट केली आहे. त्यामुळे नेटीझन्स राऊतांवर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले आहेत. राऊंताच्या ट्विटला केलेले रिप्लाय हे मजेशीर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT