Kalyan Gandhari Accident Latest Update sakal
मुंबई

Kalyan: कल्याणमध्ये धक्कादायक घटना, भरधाव जीपच्या धडकेत दोन तरुणी गंभीर जखमी

Kalyan Gandhari Accident Latest Update: रिंग रोडचे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत.

शर्मिाला वाळुंज

Kahdakpada Police : कल्याणमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणी या गंभीर जखमी झाल्या आहेत. सेजल भानुशाली व समीक्षा भानुशाली अशी जखमी तरुणींची नावे असून दोघी ही इंजिनिअरींगच्या विद्यार्थीनी आहेत.

या अपघातानंतर जीपचालक हे फरार झाले आहेत. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून थार जीपचालकाचा पोलिस शोध घेत आहेत.

कल्याण पश्चिमेतील रिंग रोड येथील गांधारी पुलाजवळील एका भरधाव जीप चालकाने दुचाकीला जोरदार धडक देत दुचाकीवरील तरुणींना जखमी केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. या दोघींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन्ही तरुणी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहेत. दुचाकीवरुन घरी परतताना दोघींचा अपघात झाला आहे.

खडकपाडा पोलिसांनी जीप चालकाचा शोध सुरु केला आहे. या जीपवर देवा ग्रुप लिहिले असल्याची माहिती हाती आली आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. रिंग रोडचे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत.

त्यात काही स्टंटबाज धूम स्टाईल वाहनचालकांमुळे या रिंग रोडवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याला पोलिसांनी वेळीच आवर घालण्याची मागणी येथील रहिवासी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT