girl 
मुंबई

धक्कादायक ! मुरुडमध्ये सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

सकाळवृत्तसेवा

अलिबाग, ता. 1 : कामावर ठेवलेल्या एका उत्तर प्रदेशातील कुटुंबाच्या आर्थिक कुचंबणेचा गैरफायदा घेत 54 वर्षांच्या नराधमाने 7 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुरूड पोलिसांनी नारायण फाके या अत्याचार करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

जंजिरा किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावरच खोराबंदर येथे नारायण फाके यांचा फार्महाऊस आहे. या ठिकाणी त्याने उत्तर प्रदेशातील एका कुटुंबाला कामाला ठेवले आहे. आई-वडील आणि दहा वर्षांचा भाऊ असे या सात वर्षांच्या पीडित मुलीचे कुटुंब आहे. खोरा बंदरात ती फक्त वडिलांबरोबर राहत होती. नारायण फाके वारंवार या फार्महाऊसमध्ये येऊन वडिलांना बाहेर जाण्यास सांगून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करीत असे. या प्रकरणाची तक्रार येथील नागरिकांनी जिल्हा महिला आणि बाल कल्याण विभागाकडे केल्यानंतर कारवाईचे चक्र गतिमान झाले.

जिल्हा महिला आणि बाल कल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. त्यापूर्वी लॉकडाऊनमध्ये आपल्या गावाला जाऊ न शकलेल्या या उत्तर प्रदेशातील कुटुंबाला रोजीरोटी आणि राहण्याच्या सुविधेची शाश्‍वती देण्यात आली. या नराधमाला आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश (विशेष न्यायाधीश पोक्‍सो) वर्षा मोहिते यांच्या न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर या अत्याचाराची क्‍लिप व्हायरल झाल्यानंतर जिल्हाभरातून याविरोधात संताप व्यक्त केला जात होता.

Shocking Seven-year-old girl tortured in Murud, accused arrested

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran War Ceasefire: युद्ध थांबलं, आता फ्लाइट भाडे कमी होणार का? ऑनलाइन खरेदी स्वस्त होईल का?

जो मालिकेत कधी नव्हताच... 'लक्ष्य'मधून काढलं या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं सडेतोड उत्तर; म्हणाले-

Hacking Safety Tips : हॅकर्सच्या हाताला लागलेत तुमचे पर्सनल फोटो अन् पासवर्ड! आत्ताच बदला मोबाईलची 'ही' १ सेटिंग, नाहीतर सगळंच संपेल

सलमानच्या खानच्या 'या' अभिनेत्रीला मातृशोक; वडिलांनीही लहानपणी सोडलेली कुटूंबाची साथ

सोन्या चांदीला झळाळी ते इंधन पुरवठा सुरळीत! युद्धविरामाचा भारताला काय होणार फायदा?

SCROLL FOR NEXT