rape case  File photo
मुंबई

नात्याला कलंक! वडिलांनीच पोटच्या मुलीवर केला बलात्कार

मुंबईत दोन घटना घडल्या

सुरज सावंत

मुंबई: मुंबईच्या ओशिवरा (oshiwara) आणि सहार (sahar) पोलिस ठाणे परिसरात बाप आणि पोरीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये आरोपी बापानेच आपल्या मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यातील ओशिवरा परिसरात राहणारी मुलगी अल्पवयीन आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (Shocking step father rapes daughter In mumbai oshiwara & sahar area)

ओशिवरा परिसरात राहणारी १६ वर्षाच्या मुलीचे आरोपी हे सावत्र वडिल आहेत. मागील अनेक दिवसांपासून आरोपी हा अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर अतिप्रसंग करत होता. रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर अल्पवयीन मुलीने पोलिसात धाव घेत आपल्या सावत्र बापाविरोधातच तक्रार नोंदवली. पीडित मुलीचा सावत्र बाप हा रिक्षा चालक असून गुन्हा नोंद होताच, पोलिसांनी त्याला अटक केली.

सहारा येथील घटना

तर सहार येथील घटनेत २० वर्षीय मुलगी शिक्षण घेते. पीडित मुलीवर मे २०१९ पासून ते आतापर्यंत तिचा बापच घरात कुणी नसताना किंवा घरातील व्यक्ती झोपल्यानंतर जिवे मारण्याची धमकी देऊन अत्यचार करायचा. नराधम वडिलाच्या या रोजच्या त्रासाला पीडित मुलगी कंटाळली होती.

मात्र वडिलांबाबत घरातल्या व्यक्तींना सांगायला ती घाबरत होती. अशा वेळी तिच्या एका मिञाजवळ पीडित मुलीने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती देत मनातल्या दुःखाला वाट मोकळी केली. या घटनेनंतर पीडितेच्या मित्राने आईसोबत पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान मुलीच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपी बापाला अटक केली आहे. या दुर्देवी घटनांमुळे परिसरात अत्यंत संताप आणि चिड व्यक्त करण्यात येत आहे. बापाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या दोन्ही आरोपींना कडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: MPSC पेपरफुटी चौकशी समितीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंना अद्याप लेखी आदेशच नाही

SCROLL FOR NEXT