मुंबई

कोरोनामुक्त व्यक्तींकडून प्लाझ्मा दानासाठी अल्प प्रतिसाद; पुन्हा संसर्ग होण्याची नागरिकांमध्ये भीती

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईतील पालिका रुग्णालयात कोरोनामुक्त रूग्णांकडून प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण हळूहळू वाढताना दिसत आहे. मात्र, हेच प्रमाण सरकारी रुग्णालयांमध्ये दिसत नसल्याचे समोर आले आहे. 

सेंट जॉर्ज या रुग्णालयातून आतापर्यंत अनेक जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 800 हून अधिक कोरोनामुक्त लोकांना रुग्णालयातून प्लाझ्मा दानासाठी संपर्क केला गेला आहे. त्यापैकी 4 ते 5 जणांनीच पुढाकार घेत ते प्लाझ्मा दाना साठी तयार झाले. बाकी लोक अजुनही कोविडच्या धक्क्यातून सावरले नसुन आपल्याला पुन्हा संसर्ग होईल या भीतीने प्लाझ्मा दाना साठी तयार झाले नसल्याचे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, कोविडवर मात केलेल्या 500 जणांनी आता पर्यंत रक्तद्रव्ये (प्लाझ्मा) दान केले असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. 29 जुलै पर्यंत ही संख्या अवघी 100 होती. ही संख्यां कमीच असून कोविडवर मात केलेल्यांनी प्लाझ्मादानासाठी पुढे येण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. 

कोविडवर मात केलेल्या रुग्णांच्या रक्तद्रव्यात (प्लाझ्मा )मध्ये कोविड विरोधातील प्रतिद्रव्ये अँटीबाॅडीज तयार होतात. असा प्लाझ्मा कोविड बाधित व्यक्तींना दिल्यास त्यांच्यात नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती तयार होऊन ते आजारावर मात करतात. जगभरात ही पध्दत वापरली जात असून मुंबईतही याचे चांगले परीणाम दिसत आहे. मात्र, प्लाझ्मा दानासाठी नागरीक घाबरुन पुढे येत नाहीत असे ही डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. 

कोण करु शकेल प्लाझ्मा दान? 

कोविडवर मात केलेल्या प्रत्येक व्यक्तीचा प्लाझ्मा वापरता येत नाही. एचआयव्ही बाधित तसेच हेपिटायटीस असलेल्या व्यक्तींचा प्लाझ्मा वापरता येत नाही. त्याच बरोबर संबंधीत व्यक्तींच्या रक्तातील प्रतिद्रव्यांची संख्या ठराविक असणे. वजन 55 पेक्षा जास्त गरजेचे असते. त्यामुळे प्लाझ्मा दानासाठी पुढे आलेल्या फक्त 20 ते 25 टक्के व्यक्तींचे प्लाझ्मा वापरता येतात. मुंबईत बरे होण्याच्या तुलनेत प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे प्लाझ्मा दानासाठी नागरीकांनी पुढे यावे असे आवाहन डाॅक्टरांनी केले आहे. 

आतापर्यंत 800 पेक्षा जास्त कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना संपर्क केला आहे. मात्र, लोक अजुनही भीतीपोटी प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घेत नाहीत. आतापर्यंत फक्त 4 ते 5 जण प्लाझ्मा दानासाठी पुढे आले आहेत. जे जे रक्तपेढीत सध्या प्लाझ्मा दान केला जात आहे. त्यासाठी 3 ते डॉक्टरांची टिम तयार केली आहे. शिवाय, सरकारचेच समाजसेवक अधिक्षक आम्ही दिलेल्या यादीतील लोकांना कॉल करुन प्लाझ्मा दानासाठी विचारतात. आता फक्त एकाच कोविड रुग्णाला प्लाझ्मा चढवला आहे. अजून दुसरा डोस बाकी आहे. त्यानंतर त्याचा रिझल्ट दिसेल. 

डॉ. आकाश खोब्रागडे,

अधिक्षक , सेंट जॉर्ज रुग्णालय

जे जे रुग्णालय समूहात 59 जणांचा प्लाझ्मा दान-

सेंट जॉर्ज, जीटी आणि जे जे या रुग्णालयाअंतर्गत येणार्या जे जे रक्तपेढीत आतापर्यंत जवळपास 59 जणांनी प्लाझ्मा दान केला आहे. त्यात सर्वाधिक कोविड योद्धा पोलिस आणि डॉक्टरांचा समावेश आहे. जे. जे रक्तपेढीतच प्लाझ्मा दान जमा केला जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत 110 बॅग्स प्लाझ्माच्या रक्तपेढीत संकलन झालेले आहे. कारण, एका व्यक्तीकडुन दोन बॅग प्लाझ्मा घेतो. प्लाटीना प्रकल्पाअंतर्गत प्लाझ्मा जमा केला जात आहे. सेंट जॉर्ज मधील रुग्णांना प्लाझ्मा मोफत दिला जातो. सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना वर उपचार घेणार्या रुग्णांसाठी मोफत प्लाझ्मा दिला जात आहे. तर, खासगी रुग्णालयातील रुग्णाला जर प्लाझ्मा हवा असेल तर त्यासाठी 7 हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. अजुनही लोक घाबरुन प्लाझ्मा दानासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे, कोरोनामुक्त लोकांनी जास्तीत जास्त प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घेऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मदत करावी. 

डॉ. विकास मैदाड,
नोडल अधिकारी, प्लाझ्मा प्रकल्प, जेजे रुग्णालय समूह

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT