मुंबई

मुंबई ठाण्यातील कोरोना रुग्णांची पुन्हा फरफट, कारण 'ही' आहे कोरोनासाठीच्या औषधांबाबतची ग्राउंड रियालिटी

मिलिंद तांबे

मुंबई : कोरोना रूग्णांसाठी संजिवनी ठरलेल्या टॉसिलीझुमॅब इंजेक्शनचा तुटवडा झाला आहे. संपूर्ण राज्यात हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बाधित रूग्णांची फरफट होत आहे. शिवाय या औषधांचा पुन्हा एकदा काळा बाजार सुरू होण्याची भिती व्यक्त होत आहे.

टॉसिलीझुमॅब, रेमेडेसिवर, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन, इटॉलिझुमॅब यांसारख्या औषधांमुळे कोरोना बाधित रूग्णांच्या सुधारणा होते. त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. गंभीर असलेल्या रूग्णांना ही औषधं संजिवनी ठरली आहेत. त्यामुळे या औषधांना मोठी मागणी आहे.

देशातील कोरोना बाधित रूग्णांची सर्वाधिक संख्या ही मुंबईत आहे. त्यामुळे मुंबईत टॉसिलीझुमॅब सारख्या औषधांना मोठी मागणी आहे. मुंबईत दिवसाला किमान 500 इंजेक्शनची मागणी असल्याचे ऑल इंडीया फूड एँड ड्रग्स लायसेंस होल्डर फाउँडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय  पांडे यांनी सांगितले.

गेल्या 15 दिवसांपासून या औषधाचा तुटवडा जाणवतोय. केवळ मुंबई, ठाणे, पुणे इथेच नाही तर हे औषध संपूर्ण राज्यात कुठेही उपलब्ध नाही. अभय पांडे यांनी या औषधाची निर्मिती करणा-या काही नामवंत कंपन्यांमधून माहिती घेतल्यानंतर ही बाब समोर आली.
टॉसिलीझुमॅब इंजेक्शन साधारणा 40 हजार रूपयांना मिळते. गेल्या महिन्यात तर हे इंजेक्शन लाखों रूपयांना विकले जात होते. सरकारच्या निर्देशानंतर एफडीए ने कडक कारवाई केल्यानंतर काही प्रमाणात या औषधांच्या काळा बाजारीला चाप लागला होता. मात्र या औषधाचा तुटवडा झाल्याने पुन्हा एकदा बाळा बाजार सुरू होण्याची शक्याता आहे. 

याबाबत प्रतिक्रिया देताना ऑल इंडीया फूड एँड ड्रग्स लायसेंस होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे म्हणालेत की, सरकार कितीही दावे करत असले तरी या औषधांचा तुटवडा आहे ही वस्तूस्थिती आहे. यामुळे गरजू रूग्णांची फरफट होतेय. सरकारने आणखी काही कंपन्यांना औषध निर्मितीची परवानगी देणे गरजेचे आहे, शिवाय शेजारील देशांमधून ही औषधं निर्यात करण्याची परवानगी देणे गरजेचे आहे.

( संपादन - सुमित बागुल ) 

shortage of antiviral injections given to covid19 patients in mumbai and thane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

Breaking: IPL 2026 चं वेळापत्रक बदलणार? RCB चे सामने एम चिन्नास्वामीवर होणार की नाही? आले मोठे अपडेट्स

LPG चं टेन्शन तर काहीच नाही..अजून खरा बॉम्ब ब्लास्ट आहे बाकी; 1 एप्रिलपासून तुमच्या खिशाला लागणार युद्धाची झळ, 'या' 15 वस्तू महागणार

'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवर पुलाव तर तुला जपणार आहेच्या सेटवर चुलीवरचं जेवण, चहा सुद्धा केला बंद!

Latest Marathi Update : युद्धाचा परिणाम झेंडू बाजारावर; दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT