mp Shrikant Shinde  
मुंबई

Shrikant Shinde : बॅनर लावून कोणी खासदार होत नाही: श्रीकांत शिंदेंचा टोला कोणाला?

शर्मिला वाळूंज

डोंबिवली - ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त "भावी खासदार'' असा उल्लेख असणारे बॅनर कल्याण लोकसभा मतदारसंघात झळकले होते. यावर बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी इच्छा कोणीही प्रकट करू शकते. बॅनर लागले म्हणजे खासदार होत नाही. भावी मुख्यमंत्री असेही बॅनर यापूर्वी लागले आहेत. पण काही झाले का? असे म्हणत माजी आमदार सुभाष भोईर यांचा बॅनर वरून समाचार घेतानाच त्यांनी दुसरीकडे महाविकास आघाडीतील इच्छुक नेत्यांची ही फिरकी घेतली.

कल्याण ग्रामीण भागातील दावडी येथील पाटीदार भवन सभागृहात कल्याण लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची शनिवारी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना खासदार डॉ. शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघात माझे काम असून त्या जोरावर लोक माझा विचार करतील असे सूतोवाच दिले आहेत.

भावी खासदार या सुभाष भोईर यांच्या बॅनर वरून बोलताना खासदार डॉ. शिंदे म्हणाले, प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली पाहिजे. स्पर्धा निर्माण झाली पाहिजे. विरोधकांशिवाय निवडणूक होऊ शकत नाही. पहिल्या निवडणुकीत मी अडीच लाखांच्या फरकाने जिंकलो. दुसऱ्या निवडणुकीत साडेतीन लाखांच्या फरकाने जिंकलोय. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे.

यासाठी प्रामाणिकपणे काम करतोय. हजारो कोटींचा निधी आणलाय अजूनही आणणार. यामध्ये कोणीही इच्छा प्रकट केली, कोणी बॅनर लावले म्हणून खासदार होत नाही. याच्या आधी देखील मोठे बॅनर लावण्यात आले भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावून मुख्यमंत्री होत नसतो. संघर्ष करण्याची तयारी पाहिजे लोकांमध्ये जाण्याचे तयारी पाहिजे.

मुंबईमध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने शिवसेना शाखा संपर्क अभियान सुरू केलं आहे. मुंबईमध्ये गेल्या 25 वर्षात ज्या सुविधा लोकांना मिळाला पाहिजे त्या सुविधा लोकांना मिळाल्या नाहीत आता मुख्यमंत्र्यांनी चार हजार कोटींचे रस्ते हाती घेतले. शाखा संपर्क अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील पदाधिकाऱ्यापर्यंत शिवसैनिकापर्यंत जनतेपर्यंत पोहोचायचं काम त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत.

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना माझ्यावर टीका करा, माझं उत्तर कामातून असेल. आम्ही पातळी कधी सोडलेली नाही आणि सोडणार देखील नाही. महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम ते करतात अशी टीका केली. पुढे बोलताना श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्राला वेगळा इतिहास, वेगळी संस्कृती असल्याचं म्हटलं.

जिथे विरोधक देखील एकमेकांचे नाव आदराने घेतात. आज सगळी पातळी सोडून सकाळ पासून रात्री झोपेपर्यंत शिव्या शाप देण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राची सांस्कृति दूषित करण्याचं काम सुरू आहे. बाकीचे राज्य ,युवक आपल्याकडे कशा प्रकारे बघतायेत. राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा होतोय हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.

इथून मागे देखील सत्तांतरे झाली. मात्र गेल्या दहा महिन्यापासून शिवसेना भाजपची सत्ता आल्यापासून पातळी सोडून हीन दर्जाच राजकारण या ठिकाणी केलं जातंय. महाराष्ट्राचे संस्कृती बिघडवण्याचा काम सध्या सुरू आहे अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली.

जिथे शिवसेनेचे खासदार आहेत तिथे शिवसेनेचे खासदारच निवडणूक लढवणार - श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

भाजपकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या. याबाबत बोलताना खासदार शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उभा करणार असे कोण म्हणाले, त्याचं नाव घ्या. भाजप नेत्यांचे जे लोकसभा निहाय दौरे आहेत ते केंद्राकडून देण्यात आले आहेत. त्यापासून आम्हाला काही त्रास नाही. प्रत्येक पक्षाला आपली पक्ष संघटना बांधण्याचा अधिकार आहे. भाजप त्यांची पक्ष संघटना बांधतेय.

जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचेच खासदार निवडणूक लढणार हे केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले. कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा करणारे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे माझे मित्र आहेत ते जेव्हा जेव्हा दौऱ्यावर आले तेव्हा मी त्यांचे स्वागत केले त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे स्पष्टीकरण दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT