Devendra Fadnavis attacks Uddhav Thackeray
Devendra Fadnavis attacks Uddhav Thackeray Devendra Fadnavis attacks Uddhav Thackeray
मुंबई

बॅग भरूनच 'वर्षा'वर या, राज्यसभेसाठी मुख्यमंत्र्यांची आमदारांसोबत बैठक

सकाळ डिजिटल टीम

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बैठकांना वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत संपली. त्यानंतर आता निवडणूक होणार, हे देखील स्पष्ट झालं. त्यामुळे आमदारांना स्वत:कडे वळवण्यासाठी खलबतं सुरू झाली आहेत. (Devendra Fadnavis News)

महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलं होतं. मात्र फडणवीसांनी काऊंटर ऑफर दिल्याने ही बोलणी फिस्कटली. यानंतर विविध अपक्षांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आज दिवसभर बैठकींचा सिलसिला सुरू राहणार आहे. दुपारी मंत्रिमंडळाची कोरोना संदर्भात बैठक आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्र्यांसोबत राज्यसभेचं समीकरण जुळवून आणण्यासाठी बैठक घेणार आहे. आणि संध्याकाळी मुख्यमंत्री राज्यातील अन्य अपक्ष आमदारांसोबत बैठक घेणार असून त्यांचं मन वळवण्याचं काम सुरू आहे.

आमदारांसाठी हॉटेल बूक

महाविकासआघाडीने त्यांची मतं फुटू नये यासाठी हॉटेल बूक केलं आहे. सर्व आमदारांना याच ठिकाणी ठेवणार असल्याचं समोर आलंय. शिवसेनेने देखील सर्व आमदारांना बॅग भरून वर्षावर बैठकीला येण्याचं सांगितलं आहे. वर्षावर मुख्यमंत्री सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

यानंतर त्यांची रवानगी हॉटेलवर होणार आहे. सर्व आमदारांना सुरक्षित ठेवणार असून त्यांची सर्व काळजी घेतली जाईल, असं सेनेच्या वतीने सांगण्यात आलंय.

हॉटेलवर खेळीमेळीचं वातावरण

संध्याकाळी सहा वाजता ही बैठक सुरू होणार आहे, उद्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलवर होणार आहे. हे प्रथमच होत नसल्याचं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. सर्व आमदारांना सोबत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. याआधी देखील चार दिवस आमदार सोबत यायचे असं ते म्हणाले. खेळीमेळीचं वातावरण असतं. ही नेहमीची प्रथा आहे. नेहमीच आमदारांना सोबत घेऊन आम्ही राजकारण केल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.

सहा जागा... सात उमेदवार.... आणि घोडेबाजार!

महाराष्ट्रातील सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने सातवा उमेदवार देऊन निवडणुकीत चुरस वाढवली आहे. मात्र यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. अपक्ष आमदारांच्या मतांवर दिल्लीचा मार्ग ठरणार असल्याने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अपक्ष आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. ८ ते १० जून दरम्यान मतं फूटू नये यासाठी मविआ सरकार आमदारांवर कडक नजर ठेवणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT