मुंबई

NCPचे सिद्धार्थ कांबळे मुंबै बँकेचे नवे अध्यक्ष; तर उपाध्यक्षपद भाजपकडे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: गेल्या अनेक वर्षापासून मुंबई जिल्हा बँकेवरचे प्रवीण दरेकरांचे वर्चस्व आता संपुष्टात आलं आहे. कारण मुंबै जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. मुंबै जिल्हा बँक अध्यक्षपद आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे विजयी झाले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपचे प्रसाद लाड पराभूत झाले आहेत. ११ विरूद्ध ९ मतांनी विजयी झाले आहेत. उपाध्यक्ष पदामध्ये टाय झालं होतं. यानंतर ईश्वर चिठ्ठीने याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर उपाध्यक्ष पद विठ्ठल भोसले यांच्याकडे गेलं आहे. थोडक्यात अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि उपाध्यक्षपद भाजपकडे गेलं आहे. एक वर्षांनंतर मुंबै बँक अध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

याआधीच मुंबै बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर दोन्ही पक्षांनी मुंबै बँकेवरील भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत सत्ता परीवर्तण करण्याची रणनीती आखल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आता मुंबै बँकेवर अध्यक्ष पदी सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

'मी कर्जाने घर घेतलं असतं आणि मेले असते तर...' उषा नाडकर्णी घराबद्दल बोलताना म्हणाल्या...

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Crime News : प्रेमाचा भयानक शेवट! पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या; पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT