मुंबई

लॉकडाऊनमध्ये अरविंदने त्यांना सिगरेट नाकारली म्हणून त्याच्या पोटात घातला...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : चीननंतर बघता बघता भारतातही कोरोनानं हाहाकार माजवला आहे. देशात कोरोनामुळे २१ दिवसांसाठी लाॅकडाऊन घेण्य़ात आलं आहे. यात संपूर्ण देशात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद असणार आहेत. अशात गोची झालीये ती ते सिगारेट आणि तंबाखूचं सेवन करणाऱ्या नागरिकांचे. याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. सिगारेट साठी नाही म्हंटल म्हणून दोन युवकांनी एका व्यक्तीची हत्या केली आहे.

व्यसनाने वेडे लोकं त्यांचं व्यसन पूर्ण झालं नाही तर काय करतील काही सांगता येत नाही. त्यात आता सरकारनं २१ दिवसांचा लॉकडाऊन केल्यामुळे सिगारेट ओढणाऱ्यांची, तंबाखू  खाणाऱ्यांची आणि दारू पिणाऱ्यांची चांगलीच झोप उडाली आहे. व्यसन पूर्ण होत नसल्यामुळे हे लोक सिगारेट, तंबाखू आणि दारू मिळवण्यासाठी वाट्टेल ती किंमत द्यायला तयार आहेत आणि वेळप्रसंगी मनासारखं न झाल्यास दुसऱ्याचा जीवही घेण्यात मागेपुढे बघत नाहीयेत.

कल्याणच्या APMC मार्केट परिसरात अशीच एक घटना घडली. सिगारेट दिली नाही म्हणून दोन व्यक्तींनी एका ३८ वर्षांच्या व्यक्तीची हत्या केली आहे. पोलिसांनी या दोघांचाही शोध सुरू केला आहे.

नक्की काय घडलं:

अरविंद शंकर कुमार असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. अरविंद कुमार हे एपीएमसी मार्केटमधल्या शौचालयाजवळ सिगारेट ओढत होते. त्याच वेळी २ युवक त्यांच्याकडे आले आणि त्यांच्याकडे सिगारेटची मागणी केली. मात्र अरविंद कुमार यांनी सिगारेट देण्यास नकार दिला. यावर संतापून या दोन युवकांनी त्यांच्या पोटावर आणि छातीवर स्क्रू ड्राइव्हरनं वार केले. यामुळे अरविंद कुमार यांचा मुत्यू झाला.

राज्यात सर्वत्र पान टपऱ्या बंद आहेत त्यामुळे या दोघांनाही सिगारेट मिळाली नसेल आणि अरविंद कुमार यांनी सिगारेट द्यायला नकार दिल्यामुळे या दोघांनी त्यांची हत्या केली असावी असं पोलिसांकडून सांगण्यात येतंय. पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे आणि या दोघांचा शोध सुरु केला आहे.

side effect of corona virus lockdown quarrels between arvind and his friend over cigarette   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT