siemens local
siemens local 
मुंबई

हार्बर मार्गावर लवकरच सर्व सिमेन्स लोकल

सकाळवृत्तसेवा

मुंबई - हार्बर मार्गावर लवकरच सर्व लोकल सिमेन्स कंपनीच्या चालवण्यात येणार आहेत. िसमेन्स कंपनीच्या आणखी तीन लोकल धावणार आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवास वेगवान होण्यास मदत होणार आहे.

जुन्या लोकल कमी उंचीच्या असतात. ‘सिमेन्स’च्या लोकलच्या तुलनेत या लोकलच्या डब्यांत कमी जागा असते. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर ‘सिमेन्स’च्या लोकलबरोबरच ‘भेल’ कंपनीच्या तसेच ‘रेट्रोफिटेड’ लोकलही धावतात. पश्‍चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर काही वर्षांत नव्या लोकल दाखल झाल्या. त्या तुलनेत हार्बर मार्ग उपेक्षित राहिला.

सध्या या मार्गावर ४० लोकल धावतात. त्यापैकी ३६ लोकल ‘सिमेन्स’च्या तर उर्वरित ‘रेट्रोफिटेड’ आहेत. हार्बर मार्गावर दररोज लोकलच्या ६१२ फेऱ्या होतात. 
सध्या हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी/ पनवेलदरम्यान धावणाऱ्या तपकिरी रंगाच्या लोकलची बांधणी जुन्या पद्धतीची आहे. या लोकलमध्ये हवा खेळती राहत नाही. आसनांचा आकारही कमी असल्याने या लोकलमधून प्रवास करणे त्रासदायक ठरते. या लोकलचा ताशी वेग ६० ते ८० किमी आहे. तुलनेत ‘सिमेन्स’च्या लोकलची बांधणी आधुनिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT