मुंबई

तब्बल 28 वर्षांनंतर उल्हासनगरमध्ये सिग्नल यंत्रणा सुरू; वाहतूक कोंडीवर नियंत्रणामुळे शहरवासीयांना दिलासा

दिनेश गोगी

उल्हासनगर : तब्बल 28 वर्षांच्या तपानंतर उल्हासनगर शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या पाचवीला पुजलेल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण येणार आहे. 

एमएमआरडीएच्या वतीने उल्हासनगरमार्गे कल्याण-बदलापूर महामार्गाचे काम सुरू आहे. पुढे या महामार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याच्या दृष्टीकोनातून वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी सिग्नल यंत्रणेबाबत महापौर लीलाबाई आशान, आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. याबाबत एमएमआरडीएला माहिती देण्यात आल्यावर महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक, लालबहादूर शास्त्री चौक, फॉरवर्ड लाईन या तीन ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे.

पालिकेतील विद्युत विभागाचे अभियंता हनुमंत खरात, उपअभियंता महेंद्र दिंडे आणि टेक्निशियन गोविंद पिंपरकर यांनी एमएमआरडीएच्या टीमला सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी सहकार्य केले आहे. सध्या या यंत्रणेची ट्रायल घेण्यात येत असून लवकरच ती कार्यरत होणार आहे. पुढे वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्यात यावी, याकरिता पालिकेकडे पाठपुरावा करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी सांगितले.

पूर्वीच्या यंत्रणेकडे दुर्लक्ष
विकासाचा पाया रचतानाच पहिल्यांदा डांबरी रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणारे पप्पू कालानी यांच्या 1987 ते 91-92 कालावधीत शहरात सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली होती. मात्र त्यांची निगा राखली न गेल्याने सर्व सिग्नलची दुरवस्था होऊन ते काढून टाकण्यात आले. ही यंत्रणा पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न झाले नसल्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, लालबहादूर शास्त्री चौक, फॉरवर्ड लाईन, नेहरू चौक, शहाड, बिर्ला गेट आदी ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रजत पाटीदारने टॉस जिंकला, दोन नव्या चेहऱ्यांना दिली संधी; कोण आहे Abhinandan Singh?

Rain Forecast : अचानक महाराष्ट्रासह अनेक राज्यात धो-धो पाऊस का सुरू झालाय? कधी थांबणार, समोर आली महत्वाची माहिती

Ohh Shit... मुंबई इंडियन्सचा उद्या सामना अन् दोन स्टार खेळाडू खेळणार नसल्याची धडकली बातमी, दोघांनी गाजवलाय T20 WC 2026

High Court: विवाहित जोडपी घटस्फोटाशिवाय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Solapur : उजव्या ऐवजी डाव्या हाताचं बोट कापलं, चिमुकला सांगत होता तरी महिला डॉक्टरने ऑपरेशन केलं; कुटुंबियांचे आरोप

SCROLL FOR NEXT