Mumbai University  esakal
मुंबई

Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक धोरणात झाले महत्वपूर्ण बदल ; घेतला हा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

Mumbai University: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व सलंग्नित बिगरस्वायत्त महाविद्यालयांत तीन ते चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. नुकताच पार पडलेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत बी. ए., बी. कॉम. आणि बी. एस्सी. या तीन ते चारवर्षीय पदवी अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाली आहे.

मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित बिगरस्वायत्त महाविद्यालयांत बी. ए., बी. कॉम. आणि बी. एस्सी. तीन ते चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम तयार करताना प्रा. रवींद्र कुलकर्णी समितीच्या अहवालातील शिफारशी, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि शासन निर्णय यांचा सर्वंकष विचार करण्यात आला आहे. यानुसार आता विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय, बहुआयामी, लवचिक, रोजगाराभिमुख आणि कौशल्याची जोड असलेले अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

समूह आणि लीड महाविद्यालयांच्या माध्यमातून या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने विशेष नियोजन केले आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यांतर्गत पारंपरिक पदवीचे अभ्यासक्रम तयार केले असून उर्वरित व्यावसायिक पदवीचे अभ्यासक्रमही लवकरच तयार केले जाणार आहेत.

अभ्यासक्रम, श्रेयांक आराखडा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने मानव्यविद्या शाखा, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या तीन ते चार वर्षीय पदवीचे अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा तयार केला आहे. राष्ट्रीय धोरणानुसार प्रागतिक दृष्टिकोन ठेऊन सर्व ८१२ बिगरस्वायत महाविद्यालयांसाठी विद्यापीठाने अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा तयार केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून विद्यापीठातील सर्व बिगर स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता हे अभ्यासक्रम शिकता येणार आहेत. यापूर्वी राज्यातील सर्वाधिक ६२ स्वायत्त महाविद्यालयांत चार वर्षीय पदवीचे अभ्यासक्रम राबविण्याचा बहुमान मुंबई विद्यापीठाला मिळाला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने हे एक महत्त्वपूर्ण टाकले आहे. पदवीच्या तीन ते चार वर्षीय अभ्यासक्रमांची आणि श्रेयांक आराखड्याची रचना करताना सर्वंकष विचार केला हे. विद्यापीठाशी संलग्नित सर्व बिगर स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रगत, कौशल्याधिष्ठीत, बहुउद्देशीय, बहुआयामी आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकता येतील.

- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT