माथाडी कामगाराचा प्रामाणिकपणा; महिलेची 18 हजारांची रक्कम केली परत! 
मुंबई

माथाडी कामगाराचा प्रामाणिकपणा; महिलेची 18 हजारांची रक्कम परत केली

दिनेश गोगी

उल्हासनगर : उल्हासनगरातील एका माथाडी कामगाराने आपला प्रामाणिकपणा दाखवत 18 हजार रुपये रोख असलेली हात बॅग पोलिसांकडे परत केली आहे. पोलिसांनी ही बॅग संबंधित महिलेला सुपूर्द केली असून, या कामगाराच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांनी त्याचा सत्कार करून शाबासकी दिली आहे.

मंगळवारी (ता.4) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास माथाडी कामगार शेखर उज्जैनवाल हे कामावरून घरी जात होते. त्यांना शहिद जनरल अरुणकुमार वैद्य टाऊनहॉलसमोरील रस्त्यावर एक हात बॅग पडलेली दिसली. ही बॅग त्यांनी खोलून पाहिली असता त्यात 18 हजार रुपयांची रक्कम, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना व मोबाईल फोन होता. शेखर याने क्षणाचाही विलंब न लावता बाजूलाच असलेले मध्यवर्ती पोलिस ठाणे गाठून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्याकडे बॅग दिली. 

पोलिसांनी महिलेच्या मोबाईलवरून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून व बॅग घेऊन जाण्यास बोलावले. बॅग हरवलेल्या महिलेचे नाव वनिता कार्य असून त्या उल्हासनगरातील गोल मैदान भागात राहतात. स्कुटीच्या पायथ्याशी बॅग ठेवलेली होती. ती कधी पडली हे त्यांच्या लक्षात आले नाही. मात्र शेखर उज्जैनवाल यांच्या प्रामाणिकपणामुळे वनिता कार्य यांना पोलिसांकरवी ही बॅग परत करण्यात आली. शेखर यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी सत्कार करून कौतुक केले आहे.

-----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT