मुंबई

शीव-पनवेल मार्ग जूनपासून खड्डेमुक्त

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - गेल्या पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीचा मार्ग म्हणून बदनाम झालेला शीव-पनवेल महामार्ग मे महिन्याच्या अखेरीस मजबूत होणार आहे. काँक्रिटीकरणाच्या कामाने वेग घेतला असल्याने हे लक्ष्य गाठणे शक्‍य होणार आहे. मार्गावरील कोपरा उड्डाणपुलावरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेच्या काँक्रिटीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

कळंबोली सर्कल ते मानखुर्द सिग्नलपर्यंतच्या शीव-पनवेल महामार्गाची गेल्या पावसाळ्यात खड्ड्यांमुळे चाळण झाली होती. मार्गावरील प्रत्येक शहराच्या प्रवेशाद्वारावर खड्ड्यांतूनच वाहनचालकांना प्रवास करावा लागत होता. जुईनगर येथे या खड्ड्यांमुळेच महाविद्यालयीन तरुणाला जीवही गमावावा लागला होता. पावसाळ्यात वाहतूक कोंडीत अडकल्याचा अनुभवही अनेकांनी घेतला होता. शीव-पनवेल मार्गावर कळंबोली, कामोठे, खारघर, बेलापूर, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी सिग्नल, वाशी गाव आणि वाशी टोलनाका या परिसरात खड्ड्यांमुळे सुमारे पाच किलोमीटरपेक्षा जास्तीचा रस्ता खराब झाला होता. तो डांबरी असल्याने खराब झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आला होता. त्यामुळे महामार्गावरील डांबरी भागात काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केला होता. त्यानुसार सप्टेंबरपासून कामाला सुरुवात झाली. सध्या महामार्गावरील कामोठे, खारघर, तुर्भे, सानपाडा, वाशी आणि मानखुर्द येथे वेगात खोदकाम सुरू आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे कामही पुढील महिन्यात पूर्ण होणार असल्याने लवकरच ही मार्गिकाही खुली करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सप्टेंबरपासून काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. आता कामाचा वेग पाहता मे महिन्याच्या अखेरपर्यंत खारघर, तुर्भे, वाशी आणि सानपाडा येथील काँक्रिटीकरणाचे ९० टक्के काम पूर्ण होईल. 
- किशोर पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

काँक्रिटीकरणाचे काम : साडेचार किलोमीटर
 खर्च : ६८ कोटी
 कामाची मुदत : १८ महिने
 काँक्रिटीकरणाचे काम करणारी कंपनी : रेलकॉन इन्फ्रास्ट्रक्‍चर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT