SIT formed to investigate BMC rs 12000 crore Scam under Mumbai Police Commissioner  sakal
मुंबई

BMC Scam : मुंबई महापालिकेत १२ हजार कोटींचा घोटाळा! पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वखाली SIT करणार चौकशी

रोहित कणसे

मुंबई महापालिकेच्या कथित घोटाळा प्रकरणाची मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. दरम्यान आता या १२००० कोटी रुपयांच्या मुंबई महापालिकेतील कथित आर्थिक अनियमिततेचा तपास करण्यासाठी SIT ची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे निर्देष दिले आहेत.

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या नेतृत्वात ही SIT चौकशी करणार आहे. तसेच मुंबई पोलीस आयुक्तांसह इतर विभागातील पोलिस अधिकाऱ्यांचा या एसआयटीमध्ये समावेश असणार आहे. ज्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपायुक्त आणि साहाय्यक पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांचा या SIT मध्ये समावेश असणार आहे.

काही दिवसांपूर्वी कॅगच्या अहवालानंतर मुख्यमंत्र्यांनी बीएमसीतील कथित आर्थिक अनियमिततेचा चौकशी करण्यासाठी SIT ची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता ही एसआयटी या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deputy CM Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज कऱ्हाड दौऱ्यावर; विदीप जाधव यांच्याही कुटुंबीयांची भेट घेणार!

मोठी बातमी! शिक्षकांच्या आंतरजिल्हा, जिल्ह्याअंतर्गत बदल्या अन्‌ शिक्षक भरती ३१ मेपूर्वी; संचमान्यता १० फेब्रुवारीपर्यंत अंतिम; पहिल्यांदा अतिरिक्तचे समायोजन

इयत्ता दहावीत ‘लेखी’त पास होणे झाले सोपे! त्रिभाषा सूत्रांनुसार २५ गुण मिळाले तरी व्हाल उत्तीर्ण; आजपासून विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा

Bharat Electronics share : भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरमध्ये वाढीची शक्यता, ५७० रुपयांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राला ९८ हजार कोटी; गेल्या वर्षीच्या तुलनेत १० हजार ३१२ कोटींची वाढ

SCROLL FOR NEXT